IPL 2023 Jos Buttler Duck : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मधला रविवार राजस्थान रॉयल्स (RR) आणि जोस बटलरच्या चाहत्यांसाठी काहीसा निराशाजनक होता. रॉयल्सला त्यांच्या स्टार खेळाडूकडून महत्त्वाची आणि मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा होती. पण जोस बटलर खाते न उघडताच बाद झाला. बटलरच्या धावा न केल्याचा फटकाही संघाला सोसावा लागला आणि राजस्थान संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यात 7 धावांनी पराभूत झाला. आरसीबीने रॉयल्ससमोर 190 धावांचे आव्हान ठेवले होते.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानची सुरुवात मोहम्मद सिराजने खराब केली, त्याने डावाच्या चौथ्या चेंडूवर जोस बटलरला त्रिफळाचीत केले. सिराज या मोसमात अप्रतिम फॉर्ममध्ये आहे, आतापर्यंत तो पॉवरप्लेमध्ये डावखुऱ्या फलंदाजांवर मात करत होता. पण आज त्याने उजव्या हाताचा फलंदाज जोस बटलरला चकवा दिला. सिराजचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत गेला आणि बटलरने तो आऊट स्विंग म्हणून खेळला. बटलर मिड-ऑफच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडूचा स्विंग त्याच्यापासून दूर गेला आणि चेंडू त्याच्या अपेक्षेपेक्षा थोडा कमी उसळला. चेंडू त्याच्या बॅटला पूर्णपणे आदळत थेट मधल्या स्टंपवर गेला आणि सिराजच्या चेंडूचा वेग इतका होता की मधला स्टंप जागेवरून उखडला आणि मागे पडला. या मोसमात बटलर खाते न उघडता बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. या खेळीपूर्वी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धही तो शून्यावर बाद झाला होता.
` –
| / |Knocked him over!@mdsirajofficial beats @josbuttler's defence and gets @RCBTweets a MASSIVE breakthrough! 💥
Tune-in to #RCBvRR at #IPLonStar, LIVE now on Star Sports Network#GameOn #BetterTogether pic.twitter.com/EKW0uTb2ec
— Star Sports (@StarSportsIndia) April 23, 2023
हेही वाचा – IPL 2023 : अर्शदीप सिंगने मोडलेल्या स्टम्पची किंमत ‘इतकी’ लाख..! BCCI ला जब्बर नुकसान
असा रंगला सामना…
आयपीएल 2023 चा 32 वा सामना बंगळुरूमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात आरसीबी संघाला आठ धावांनी विजय मिळवता आला. वास्तविक, या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित षटकात नऊ गडी गमावून 189 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरआर संघ निर्धारित षटकात सहा गडी गमावून केवळ 182 धावाच करू शकला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!