IPL 2023 RCB vs KKR : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल 2023च्या 36व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 21 धावांनी पराभव केला. यासह कोलकाताने आपल्या पराभवाची मालिका खंडित करत स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला. नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूला 20 षटकात 201 धावांचे आव्हान दिले. पण बंगळुरूला 20 षटकात179 धावांपर्यंतच पोहोचता आले. बंगळुरूचा हा चौथा पराभव ठरला.
कोलकाताकडून जेसन रॉयने धमाल सुरुवात करत अर्धशतक ठोकले. त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी करत 56 धावा केल्या. मधल्या फळीत कप्तान नितीश राणाने 48, व्यंकटेश अय्यरने 31 धावा केल्या. रिंकू सिंहने शेवटच्या काही चेंडूत 18 धावा केल्यामुळे कोलकाताला 200 धावांचा आकडा गाठता आला. बंगळुरूकडून हसरंगा आणि विजयकुमार विषक यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
KKR keep breathing in #IPL2023 with a convincing win in Bengaluru 🙌https://t.co/pNjcpKx7Z6 | #RCBvKKR pic.twitter.com/yQllcjCIgN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 26, 2023
हेही वाचा – मुंबई पुन्हा रडारवर? ‘या’ तारखेला दहशतवादी हल्ल्याची भीती; कलम 144 लागू
प्रत्युत्तरात बंगळुरूकडून फाफ डु प्लेसिस (17) आणि ग्लेन मॅक्सवेल (5) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. कप्तान विराट कोहलीने 6 चौकारांसह 54 धावा केल्या, पण आंद्रे रसेलने त्याचा अडथळा दूर केला. महिपाल लोमरोर (34) आणि दिनेश कार्तिक (22) मोक्याच्या क्षणी बाद झाले आणि कोलकाताने विजय आपल्या झोळीत टाकला. कोलकाताकडून वरूण चक्रवर्तीने दमदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले. सुयश शर्मा आणि आंद्रे रसेल यांना 2 बळी मिळाले. 20 षटकात बंगळुरूने 8 बाद 179 धावा केल्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!