IPL 2023 : “शुबमन गिलने मुंबई इंडियन्ससाठी…”, सचिन तेंडुलकरकडून ‘असं’ कौतुक!

WhatsApp Group

IPL 2023 Sachin Tendulkar On Shubman Gill : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर गुजरात टायटन्सने (RCB vs GT) दणदणीत विजय मिळवल्यानंतर ‘क्रिकेटचा देव’ म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने शुबमन गिलवर स्तुतीसुमने उधळली आहेत. सचिन तेंडुलकरचे हे ट्वीट शुबमनसाठी खास ठरले. गुजरातच्या या विजयाचा मुंबई इंडियन्सला खूप फायदा झाला असून मुंबईने तीन वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीचा पराभव आवश्यक होता आणि शुबमन गिलने नाबाद 104 धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्वीट केले, ”कॅमरून ग्रीन आणि शुबमन गिल यांनी मुंबई इंडियन्ससाठी शानदार फलंदाजी केली. विराट कोहलीनेही धडाकेबाज खेळी करत शतके ठोकली. त्या सर्वांची स्वतःची शैली आणि स्वतःचा क्लास होता. MI ला प्लेऑफमध्ये पाहून खूप आनंद झाला.”

हेही वाचा – IPL 2023 : RCB बाहेर गेल्यानंतर नवीन उल हकने विराटला डिवचलं, शेअर केली Story!

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबीने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर 197 धावा ठोकल्या. किंग कोहलीने 101 धावांची नाबाद खेळी केली. कोहलीच्या या खेळीवर शुबमन गिलने शतक झळकावले. गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने हे लक्ष्य 5 चेंडू आणि 6 विकेट्स शिल्लक असताना गाठण्यात यश मिळवले. याआधी मुंबईने शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात कॅमेरून ग्रीनने शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासात एका दिवसात तीन फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई इंडियन्ससह, गतविजेता गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. पहिला क्वालिफायर गुजरात आणि चेन्नई यांच्यात खेळला जाईल, तर एलिमिनेटरमध्ये लखनऊचा सामना मुंबईशी होईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment