IPL 2023 RCB vs GT : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई प्लेऑफसाठी पात्र होणारा चौथा संघ ठरला. आयपीएल 2023 मध्ये 70व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेट्सने पराभव केला. प्लेऑफची फेरी गाठण्यासाठी बंगळुरूला आवश्यक होता. पण त्यांना पुन्हा एकदा अपयश आले. बंगळुरूला यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकता येणार नाही.
या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. निर्णायक सामन्यात विराट कोहली गुजरातविरुद्ध एकटा लढताना दिसला. या सामन्यात कोहली कर्णधार फाफ डुप्लेसिससोबत सलामीला आला आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. यानंतर डुप्लेसिस 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आला आणि त्याने 11 धावा केल्या तर लोमरर एक धावा काढून बाद झाला. यानंतर ब्रेसवेल 26 धावा आणि दिनेश कार्तिक खाते न उघडता बाद झाला, पण कोहली दुसऱ्या टोकाला उभा राहिला आणि धावा करत राहिला. 20 षटकात बंगळुरूने 5 बाद 197 धावा केल्या. विराटने 13 चौकार आणि एका षटकारासह 101 धावा केल्या.
The 𝗠𝗨𝗠𝗕𝗔𝗜 𝗜𝗡𝗗𝗜𝗔𝗡𝗦 have qualified for the #TATAIPL playoffs 🙌
Congratulations to the @mipaltan 👏🏻👏🏻 pic.twitter.com/Y4Gj4C5qB0
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023
हेही वाचा – ‘या’ देशाच्या विमान कंपनीने आपल्याच राष्ट्रपतींवर घातली बंदी! जाणून घ्या कारण
Superheroes. Magicians. Monsters. You call them Avengers, we call them Mumbai Indians. 🦹♂️
Playoffs, here we come. 👊#OneFamily #MIvSRH #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/478KvXswYC
— Mumbai Indians (@mipaltan) May 21, 2023
प्रत्युत्तरात गुजरातने वृद्धिमान साहा (12)ला स्वस्तात गमावले. त्यानंतर शुबमन गिल आणि विजय शंकर यांनी 123 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर शुबमनने झटपट धावा केल्या. विजय शंकरने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. शुबमनने षटकार ठोकत शतक पूर्ण केले सोबतच गुजरातला विजयही मिळवून दिला. त्याने 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी केली. 20 षटकात गुजरातने 4 बाद 198 धावा केल्या. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले.