IPL 2023 PBKS vs RR : आयपीएल 2023 च्या 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे, तर आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्जचा प्रवास संपला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने दोन चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 51 धावा केल्या. या विजयासह राजस्थानचे 14 गुण झाले असून ते आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत.
187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. संघाने दुसऱ्याच षटकात सलामीवीर जोस बटलरची विकेट गमावली. त्याला खातेही उघडता आले नाही. पडिक्कल आणि जयस्वाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. देवदत्त 30 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. कर्णधार संजू सॅमसनला केवळ दोन धावा करता आल्या. यशस्वी 36 चेंडूत 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रियान परागने 20 धावांची दमदार खेळी केली. शिमरॉन हेटमायर 28 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेलने 4 चेंडूत 10 धावा केल्या आणि शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
The @rajasthanroyals stay alive in the season courtesy of a remarkable chase 🙌#RR clinch a 4-wicket victory in Dharamsala 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/3cqivbD81R #TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/rXvH1o0uf1
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2023
हेही वाचा – Video : स्कॉर्पिओ खरेदी केल्यानंतर नाचू लागलं आख्ख कुटुंब! आनंद महिंद्रा म्हणाले, “हाच खरा…”
Dhruv Jurel, nerves of steel 💎#PBKSvRR #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 #EveryGameMatters pic.twitter.com/s0n0ASMQK5
— JioCinema (@JioCinema) May 19, 2023
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने सॅम करनच्या 49 धावांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या. पंजाबकडून सॅम करनने सर्वाधिक 49 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून नवदिन सैनीने तीन बळी घेतले. प्रथम फलंदाजीला उतरताना पंजाबचा डाव गडगडला. संघाने 7 षटकांत चार विकेट गमावल्या होत्या. पहिल्याच षटकात प्रभासिमरन (2) बाद झाला. अथर्व 12 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. कर्णधार शिखर धवन 12 चेंडूत 17 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लिव्हिंग्स्टनने खराब शॉट खेळून वैयक्तिक 9 धावांवर आपली विकेट गमावली. जितेश शर्मा आणि सॅम करण यांच्यात पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी झाली. आणि त्यानंतर करणने शाहरुखसोबत सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. शाहरुख 23 चेंडूत 41 धावा करून नाबाद परतला.