IPL 2023 PBKS vs MI Rohit Sharma Duck : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला आहे. मोहालीतील पंजाब किंग्जविरुद्धच्या (PBKS vs MI) सामन्यात तो शून्यावर बाद झाला. रोहितनेया आयपीएलमध्ये आत्तापर्यंत एकच अर्धशतक केले आहे. पंजाबविरुद्ध त्याने 3 चेंडूचा सामना केला, पण खातेही न उघडता तो माघारी परतला.
पंजाबचा कप्तान शिखर धवनने या सामन्यात अष्टपैलू खेळाडू ऋषी धवनला खेळण्याची संधी दिली. ऋषीनेही संधीचे सोने करत रोहितला बाद केले. रोहित झेलबाद झाला. मॅथ्यू शॉर्टने थर्ड मॅनला त्याचा झेल टिपला. आयपीएलमध्ये रोहित 15व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. रोहितच्या फॉर्मववर नेटकरी टीका करत आहेत.
रोहित शर्माची विकेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
– No drama
– No fight
– No agression
– No abusive behaviour
– No performance15 Ducks in IPL by the Duckman – Rohit Sharma #PBKSvsMI pic.twitter.com/Mnw0TDntP4
— Aarav (@sigma__male_) May 3, 2023
Rohit Sharma's wagon wheel 😭😭 https://t.co/WUMMrrpDPv pic.twitter.com/SEGBpxBV35
— 𝐒𝐡𝐫𝐞𝐲𝐚𝐬𝐌𝐒𝐃𝐢𝐚𝐧™ (@Itzshreyas07) May 3, 2023
#RohitSharma𓃵 #MIvPBKS pic.twitter.com/YEMEroV8O1
— RADHE ࿗🇮🇳 (@Iamradhe_p00) May 3, 2023
हेही वाचा – भारतात लाँच झाली 16 लाखांची बाइक..! फीचर्स, लूक पाहून तुम्हालाही घ्यावीशी वाटेल
R0️⃣ ➡️ DA1️⃣#PBKSvMI #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL pic.twitter.com/TZlKSzXmvW
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 3, 2023
पंजाबची अफलातून बॅटिंग
टॉस गमावलेल्या पंजाबने 20 षटकात 3 बाद 214 धावा केल्या. चांगल्या सुरुवातीनंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 82 तर जितेशने 27 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावांची खेळी केली. मुंबईकडून पीयुष चावलाने 2 विकेट्स घेतल्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!