IPL 2023 PBKS vs MI : “आम्ही गुन्हेगाराला पकडलं आणि…”, मुंबई पोलिसांचं पंजाब किंग्जला चोख प्रत्युत्तर!

WhatsApp Group

IPL 2023 Mumbai Police On Punjab Kings : आयपीएलच्या 16व्या हंगामात बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ज (MI vs PBKS) चा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मुंबईला 215 धावांचे लक्ष्य दिले होते. जे मुंबईने सहज गाठले. मुंबईने वानखेडे स्टेडियमवरील पराभवाचा बदला पंजाब संघाला त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर हरवून घेतला.

मुंबईसाठी इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा, टिम डेव्हिड यांनी महत्त्वपूर्ण खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर पुन्हा एकदा पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग चर्चेत आला आहे. या आयपीएल सामन्यानंतर मुंबई पोलिसांनी पंजाब संघाकडे एक प्रकरण सोपवले आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, वाचा नवीन किंमत

बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाबच्या अर्शदीप सिंगलाही पराभवाचा धक्का बसला आहे. याच संघाविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगने दोन स्टम्प तोडले होते. पंजाबच्या विजयानंतर अर्शदीप चर्चेत आला होता. मात्र, कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी अचूक सूड उगवला. त्यांनी अर्शदीप सिंगला चोपले. अर्शदीप सिंगने 4 षटकात 66 धावा दिल्या.

अर्शदीप सिंगला झालेली धावांची मारहाण पाहून मुंबई पोलिसांनी ट्वीट केले आहे. अर्शदीप सिंगने दिलेल्या धावांचा संदर्भ देत मुंबई पोलिसांनी पंजाब किंग्जला ट्वीट केले की आम्ही गुन्हेगाराला यशस्वीपणे पकडलं आणि त्यांना शिक्षा केली.

असा रंगला सामना…

प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने लियाम लिव्हिंगस्टोनच्या 82 धावा आणि जितेश वर्माच्या 49 धावांच्या जोरावर 214 धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कॅमेरून ग्रीनने तुफानी फलंदाजी केली. पण, तोही लवकर आऊट झाला. कॅमेरून ग्रीननंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबई संघाच्या विजयाचा पाया रचला. इशान किशनने 75 तर सूर्यकुमार यादवने 66 धावा केल्या. दोघांनी मुंबई संघासाठी 116 धावांची भागीदारी केली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment