IPL 2023 Mumbai Indians : क्रिकेट हा असा खेळ आहे की त्यात अनेकदा विजय नव्हे तर अनपेक्षित पराभवही पाहायला मिळतो. आयपीएल 2023 मधील लीग टप्प्यातील शेवटच्या 2 सामन्यांची स्थिती अशीच होती. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोनच संघांना प्ले ऑफच्या शर्यतीमध्ये पोहोचता आले. मुंबईने शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. यानंतर मुंबईच्या नजरा गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणाऱ्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्याच्या निकालाकडे लागल्या होत्या.
बंगळुरूने हा सामना जिंकला असता तर उत्तम धावगतीमुळे प्लेऑफचे तिकीट बुक केले असते. पण, गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने आरसीबीच्या आशांवर पाणी फेरले आणि शतक ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला.
Here's the celebrations of our Mumbai Indians boys. They depicted our reaction after today's match 💙🔥 pic.twitter.com/4tFqw4JiCG
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) May 21, 2023
शुबमन गिलने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयी षटकार ठोकताच आपले शतक पूर्ण केले. तसेच हॉटेलमध्ये बसून हा सामना पाहत मुंबई इंडियन्सचे खेळाडू आनंदाने उड्या मारू लागले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इशान किशन, कॅमरून ग्रीन आरसीबीच्या पराभवाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.
आरसीबीने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला असता, तर समान गुण असूनही नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये पोहोचणारा मुंबई हा चौथा संघ बनला असता. पण, विराट कोहलीचे सलग दुसरे शतकही संघाला कामी आले नाही आणि शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने बंगळुरूचा 6 विकेट्सने पराभव केला आणि त्यामुळे साखळी फेरी संपल्यानंतर गुजरात गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला. मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने शतक झळकावले.
आता एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. त्याचवेळी क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची गुजरात टायटन्सशी स्पर्धा होईल.