IPL 2023 : चेन्नई दरवेळी प्लेऑमध्ये कशी पोहोचते? धोनीने सांगितले सीक्रेट!

WhatsApp Group

IPL 2023 CSK In playoffs : आयपीएल 2023 च्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला. यासह आता प्लेऑफची लढतही रोमांचक वळणावर आली आहे. चेन्नईच्या विजयामुळे गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. आता चेन्नई प्लेऑफमध्ये गेली आहे. त्यांचे 14 सामन्यांत 17 गुण होते, तर दिल्लीने 14 सामन्यांत 10 गुणांसह प्रवास संपवला.

धोनीचा खुलासा!

सामना संपल्यानंतर जेव्हा ब्रॉडकास्टरने महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्जच्या यशाचे रहस्य काय आहे असे विचारले तेव्हा धोनीने मनाला भिडणारे उत्तर दिले. माही म्हणाला, “यशाची कोणतीही कृती नाही, तुम्ही प्रयत्न करा आणि सर्वोत्तम खेळाडू निवडून घ्या आणि त्यांना परफॉर्म करण्यासाठी सर्वोत्तम स्लॉट द्या. खेळाडूला वारंवार संधी देणे देखील मदत करते. टीम मॅनेजमेंटचीही भूमिका महत्त्वाची असते पण खेळाडू सर्वात महत्त्वाचे असतात.”

हेही वाचा – IPL 2023 : रिंकू सिंह शेवटच्या बॉलपर्यंत लढत राहिला, पण..! कोलकाता स्पर्धेबाहेर

धोनीने संघाचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेचे कौतुक केले आणि सांगितले की त्याच्यात बरीच सुधारणा झाली आहे, तो दबावाखाली चांगला खेळतो आहे. मला वाटतं गोलंदाजांनीही जबाबदारी घेतली आहे, पथिराना डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट आहे पण तुषारनेही ती भूमिका चोख बजावली आहे. मला वाटते की आम्हाला प्रथम संघातील खेळाडू शोधून त्यांची निवड करणे आवश्यक आहे बाहेरून निर्णय घेणे कठीण आहे, आम्ही खेळाडू आणि वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो.

प्लेऑफमध्ये 3 संघांचे स्थान निश्चित

आता चेन्नईशिवाय गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले आहे. गुजरातने 13 सामन्यांतून 18 गुण घेतले आहेत. ती गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. शेवटचा साखळी सामना हरली तरी ती पहिल्या क्रमांकावर राहील. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Leave a comment