IPL 2023 Mini Auction : पुढील हंगामासाठी इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) लिलाव २३ डिसेंबर २०२२ रोजी कोची येथे होणार आहे. ESPN क्रिकइन्फोच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. आयपीएल २०२३ च्या लिलावात प्रत्येक संघाचे एकूण बजेट ९० कोटी रुपयांवरून ९५ कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या गोष्टी
- आयपीएल २०२३मध्ये एकूण १० संघ खेळणार आहेत.
- १५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक संघाने आपल्या संघातून कोणते खेळाडू सोडले आहेत याची माहिती द्यावी लागेल. जे खेळाडू सोडले जातील त्यांना आयपीएल लिलावात जाण्याची संधी मिळणार आहे.
- प्रत्येक संघाच्या पाकिटात ९५ कोटी रुपये असतील.
हेही वाचा – Pak Vs Nz Semifinal : अंपायरनं एकाच बॅट्समनला २ चेंडूत २ वेळा दिलं आऊट..! पाहा Video
JUST IN: The IPL mini-auction for next season will take place on December 23 in Kochi #Breaking pic.twitter.com/0x4gPwKTfm
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 9, 2022
या मिनी लिलावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतंत्रपणे लाइव्ह टेलिकास्ट केले जाईल. आता या दोघांचे मीडिया हक्क वेगळे करण्यात आले आहेत. हा मिनी लिलाव मेगा लिलावाप्रमाणे दोन दिवस चालणार नसून लिलावाची सर्व प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण होणार आहे. यापूर्वीच्या मिनी लिलावात संघांनी परदेशी खेळाडूंवर मोठ्या बोली लावल्या होत्या.
सर्व १० संघांच्या पर्सबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या हंगामाच्या लिलावानंतर, पंजाब किंग्जकडे सर्वाधिक ३.४५ कोटी रुपये शिल्लक होते, तर लखनौ सुपर जायंट्सने संपूर्ण पर्स रिकामी केली आहे. पंजाब व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्जकडे २.९५ कोटी, बंगळुरूकडे १.५५ कोटी, राजस्थान रॉयल्सकडे ९५ लाख, कोलकाता नाइट रायडर्सकडे ४५ लाख, गुजरात टायटन्सकडे १५ लाख आणि मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे प्रत्येकी १० लाख रुपये आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!