IPL 2023 : यशस्वी जयस्वालची सेंच्युरी! मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं; 1000व्या मॅचमध्ये रचला इतिहास

WhatsApp Group

IPL 2023 MI vs RR Yashasvi Jaiswal Century : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला आहे. यशस्वीने वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्ध 53 चेंडूत आपले पहिले आयपीएल शतक झळकावले. 21 वर्षीय यशस्वी हा आयपीएलमध्ये शतक झळकावणारा चौथा सर्वात तरुण फलंदाज आहे. या सामन्यात यशस्वीने मुंबईच्या तगड्या गोलंदाजांची पिसे काढत सेंच्युरी ठोकली.

यशस्वीने मुंबईविरुद्ध 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांसह 124 धावांची खेळी केली. 20व्या षटकात यशस्वी बाद झाला. मुंबईचा वेगवान गोलंदाद अर्शद खानने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यशस्वीच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 7 बाद 212 धावा उभारल्या. आयपीएल 2023 मधील हे तिसरे शतक आहे. याआधी, SRHच्या हॅरी ब्रूक आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या व्यंकटेश अय्यरने शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IPL 2023 : अरेरे, धोनीचे 2 Six फुकट..! शेवटच्या चेंडूवर पंजाब किंग्जचा थरारक विजय

आयपीएलमधील सर्वात तरुण शतकवीर

  • 19 वर्षे 253 दिवस – मनीष पांडे
  • 20 वर्षे 218 दिवस – ऋषभ पंत
  • 20 वर्षे 289 दिवस – देवदत्त पडिक्कल
  • 21 वर्षे 124 दिवस – यशस्वी जयस्वाल
  • 22 वर्षे 151 दिवस – संजू सॅमसन
  • 23 वर्षे 122 दिवस – क्विंटन डी कॉक

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment