IPL 2023 : मुंबईच्या खेळाडूकडून मैदानातील गाडीचं नुकसान..! आता TATA देणार 5 लाख; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 : आयपीएलच्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 6 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात मुंबई संघाने 200 धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 83 तर नेहल वढेराने 34 चेंडूत 52 धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. नेहलने या इनिंगमध्ये एवढा धोकादायक षटकार मारला की चक्क स्टेडियमधील टाटाच्या कारचे नुकसान झाले.

वनिंदू हसरंगाने आरसीबीसाठी 11 वे षटक टाकले होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 22 वर्षीय वढेराने सिंगल घेत सूर्याला स्ट्राइक दिली. सूर्यकुमार यादवने षटकार ठोकत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यानंतर नेहलकडे स्ट्राईक सोपवली. त्यानंतर वढेराने असा षटकार मारला की चेंडू सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या कारला लागला. कारच्या दरवाजाला डेंट आला.

टाटा देणार 5 लाख रुपये

टाटा मोटर्स ही आयपीएलची अधिकृत प्रायोजक आहे. असा नियम आहे की, सामन्यातील कोणत्याही फलंदाजाने टाटा पंच बोर्डावर किंवा सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या टिआगो ईव्ही कारवर चेंडू मारला, तर टाटा समूहाकडून 5 लाख रुपये दिले जातात. अशा परिस्थितीत आता टाटा टियागो ईव्ही या शॉटच्या बदल्यात पाच लाख रुपये दान करणार आहे. पाच लाख रुपयांची ही मदत कर्नाटकातील कॉफीच्या बागांची जैवविविधता वाढवण्यासाठी केली जाणार आहे.

हेही वाचा – HDFC बँकेकडून ग्राहकांना धक्का..! ‘या’ कारणामुळे कर्ज झाले महाग; EMI ही वाढणार!

नेहल वढेराआधी चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडनेही अशाच षटकाराने कारचे नुकसान केले आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने 31 चेंडूत 57 धावा केल्या. या डावात त्याने षटकार मारून टाटाच्या कारचे नुकसान केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment