IPL 2023 MI vs RCB Mumbai Indians Win : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा 200 धावांचे लक्ष्य पार केले आहे. वानखेडेवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबईने (MI vs RCB) 6 गडी राखून विजय मिळवला. सूर्यकुमार यादवची धडाकेबाज फलंदाजी मुंबईच्या विजयात मोलाची ठरली. मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजी दिली. फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईला 200 धावांचे लक्ष्य दिले. मुंबईने हे लक्ष्य 16.3व्या षटकातच पूर्ण केले. या विजयासह मुंबई 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
बंगळुरूकडून मोठे आव्हान
वानखेडेवर टॉस गमावलेल्या बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात बाद धावा केल्या. कप्तान फाफ डु प्लेसिसने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 65, ग्लेन मॅक्सवेलने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावा केल्या. दिनेश कार्तिकने झटपट 30 धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने सर्वाधिक 3 बळी घेतले.
हेही वाचा – IPL 2023 : नवीन उल-हकचं चाललंय काय? विराटशी पुन्हा घेतला पंगा; पाहा!
Mumbai Indians going from 8 to 3 on points table pic.twitter.com/njU9kGyqFL
— Sagar (@sagarcasm) May 9, 2023
Manla re bhau 🫡#OneFamily #MIvRCB #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 @surya_14kumar pic.twitter.com/LIOVusW6rF
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2023
मुंबईची धडाकेबाज फलंदाजी
बंगळुरूच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून इशान किशनने जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याने 4 चौकार आणि 4 षटकारांसह 42 धावा केल्या. रोहित शर्मा (7) पुन्हा अपयशी ठरला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी शतकी भागीदारी केली. सूर्य़ाने तुफानी अंदाजात 35 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 83 धावा केल्या. तर नेहलने 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 52 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून वनिंदू हसरंगा आणि विनयकुमार विषक यांनी 2 बळी घेतले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!