IPL 2023 : अर्शदीप सिंगने मोडलेल्या स्टम्पची किंमत ‘इतकी’ लाख..! BCCI ला जब्बर नुकसान

WhatsApp Group

IPL 2023 MI vs PBKS LED Stump Cost : इंडियन प्रीमियर लीग 2023च्या 16व्या हंगामातील 31वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्स संघाचा 13 धावांनी पराभव केला आहे. पंजाब किंग्जच्या युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 20व्या षटकांत दोन चेंडूंमध्ये दोन मिडल स्टम्प मोडले.

शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. मुंबईकडून तिलक वर्मा आणि टिम डेव्हिड क्रीजवर उपस्थित होते. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलकला क्लीन बोल्ड केले. या यॉर्कर चेंडूवर अर्शदीप सिंगने मधला स्टम्प तोडला. यानंतर स्टम्प बदलण्यात आला. चौथ्या चेंडूवर अर्शदीपनेही नेहल वधेराला यॉर्कर टाकून मधला स्टम्प तोडला. यानंतर स्टम्प पुन्हा बदलण्यात आला. अशाप्रकारे अर्शदीपने शेवटच्या षटकात केवळ दोन धावा देत दोन महत्त्वाचे बळी घेतले.

हेही वाचा – IPL 2023 : अर्शदीप सिंगचा मुंबईत कहर..! मोडले दोन मिडल स्टम्प; पाहा Video

स्टम्पची किंमत किती?

अर्शदीपची गोलंदाजी बघायाला मजा आली, पण त्यामुळे भरपूर नुकसान झाले. तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या या स्टम्पच्या सेटची किंमत सुमारे 35 ते 40 लाख रुपये आहे. या स्टम्पच्या सेटची किंमत संघाच्या मॅच फीएवढी आहे. एकदिवसीय सामने खेळणाऱ्या भारतीय संघाला सुमारे 60 लाख रुपये आणि टी-20 संघाला 33 लाख रुपये मिळतात. स्टम्पच्या सेटची किंमतही याच्या आसपास आहे.

LED स्टम्प कोणी बनवला?

एलईडी स्टम्पचा शोध ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉन्टे अकरमन यांनी लावला. त्यांनी डेव्हिड लेगिटवुडसोबत व्यवसाय भागीदार म्हणून झिंग इंटरनॅशनलची स्थापना केली आणि बिग बॅश लीग दरम्यान 2013 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याची कल्पना विकली. 2013 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान आयसीसीने त्याचा प्रयोग म्हणून वापर केला होता. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment