IPL 2023 : मुंबई इंडियन्सने मारलं मैदान..! आकाशचे 5 विकेट्स; लखनऊचा धुव्वा!

WhatsApp Group

IPL 2023 MI vs LSG Eliminator : आयपीएल 2023च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 81 धावांनी धुव्वा उडवला आहे. मुंबईच्या विजयात वेगवान गोलंदाज आकाश मधवालने सिंहाचा वाटा उचलला. त्याने 5 धावांत 5 बळी घेतले. या विजयानंतर लखनऊचा संघ स्पर्धेबाहेर झाला असून मुंबई सेमीफायनल खेळणार आहे. हा सामना गुजरात टायटन्सशी 26 मे रोजी होईल.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून मुंबईने फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत 8 गडी गमावून 182 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेल्या नेहल वढेराने 12 चेंडूत 23 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 33 धावांची खेळी केली. लखनऊकडून नवीन उल हकने 38 धावांत 4 बळी घेतले. तर यश ठाकूरला 3 बळी मिळाले. रोहित शर्माने मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कुमार कार्तिकेयच्या जागी हृतिक शोकिनला संधी दिली. क्विंटन डी कॉकला लखनऊ संघातील प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले.

हेही वाचा – IPL 2023 : रवींद्र जडेजा पुढच्या वर्षी RCB मध्ये जाणार? वाचा नेमकी भानगड काय!

प्रत्युत्तरात लखनऊची सुरुवात अतिशय खराब झाली. काइल मेयर्स (18), प्रेरक मंकड (3), कप्तान कृणाल पांड्या (8) अपयशी ठरले. मुंबईने क्षेत्ररक्षणात कमाल केली. त्यांनी लखनऊच्या मार्कस स्टॉइनिस (40), दीपक हुडा (15), कृष्णप्पा गौतम (2)n यांना धावबाद केले. मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनऊच्या फलंदाजांची भंबेरी उडवत अवघ्या 5 धावांत 5 बळी घेतले. लखनऊचा संघ 16.3 षटकात 101 धावांवर ऑलआऊट केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment