IPL 2023 : एकच वादा, सूर्या दादा..! सूर्यकुमार यादवचं ‘चोपदार’ शतक; गुजरातच्या खेळाडूंकडूनही कौतुक

WhatsApp Group

IPL 2023 MI vs GT Suryakumar Yadav Maiden Century : एकच वादा…सूर्या दादा! आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव जोरात तळपत आहे. यंदाच्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध सूर्यकुमारने आपले पहिले आयपीएल शतक ठोकले. 20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमारने षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. वानखेडेवरील सामन्यात सूर्याने आपल्या चौफेर फटकेबाजीने सर्वांना थक्क केले. शतकानंतर गुजरातच्या खेळाडूंनीही सूर्याचे कौतुक केले. सूर्याने या सामन्यात 49 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 103 धावा ठोकल्या.

मुंबईचे गुजरातला मोठे आव्हान

या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पांड्याने मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. रोहित शर्मा आणि इशन किशन यांनी 61 धावांची सलामी दिली. रोहितने 29 धावा केल्या. तर इशानने 31 धावा केल्या. या दोघांना राशिद खानने माघारी पाठवले. मागील सामन्यातील अर्धशतकवीर नेहल वढेरा 15 धावांवर माघारी परतला. तर आजच्या सामन्यात संधी मिळालेला विष्णू विनोदने 30 धावांचे योगदान दिले. मुंबईने गुजरातसमोर 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने 30 धावांत 4 बळी घेतले.

हेही वाचा – फ्रिजमधील फ्रिजर वरच्या बाजूला का असतो? 99% लोकांना माहीत नसेल उत्तर!

मुंबई इंडियन्ससाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

  • 114* – सनथ जयसूर्या विरुद्ध CSK, मुंबई WS, 2008
  • 109* – रोहित शर्मा विरुद्ध KKR, कोलकाता, 2012
  • 103* – सूर्यकुमार यादव विरुद्ध GT, मुंबई WS, 2023
  • 100* – सचिन तेंडुलकर विरुद्ध KTK, मुंबई WS, 2011
  • 100* – लेंडल सिमन्स विरुद्ध PBKS, मोहाली, 2014

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment