IPL 2023 MI vs GT : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव करत सातवा विजय नोंदवला. या विजयासह मुंबई संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ 191 धावा करू शकला.
टॉस गमावलेल्या मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या 103 धावांच्या जोरावर 5 बाद 218 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमारशिवाय रोहित शर्माने 29, इशान किशनने 31 आणि विष्णू विनोदने 30 धावा केल्या. त्याचवेळी गुजरातकडून राशिद खानने चार आणि मोहित शर्माने एक विकेट घेतली.
Iss muskaan ki chamkaan! 🥹🏆#OneFamily #MIvGT #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @surya_14kumar pic.twitter.com/SV8MzsBIL6
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2023
हेही वाचा – IPL 2023 : एकच वादा, सूर्या दादा..! सूर्यकुमार यादवचं ‘चोपदार’ शतक; गुजरातच्या खेळाडूंकडूनही कौतुक
We won’t get tired of saying: Surya, tula 🙏#OneFamily #MIvGT #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 @surya_14kumarpic.twitter.com/5l9FP6bbn3
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2023
प्रत्युत्तरात गुजरातचा संघ आठ विकेट्सवर केवळ 191 धावा करू शकला. राशिद खानने गुजरातसाठी नाबाद 79 धावांची खेळी केली, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. राशिदने 3 चौकार आणि 10 षटकार ठोकले. गुजरातकडून राशिद खानशिवाय डेव्हिड मिलरने 41 आणि विजय शंकरने 29 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने तीन बळी घेतले. पियुष चावला आणि कुमार कार्तिकेयने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!