IPL 2023 Match Fixing : आयपीएल लीग 2023 मध्ये फिक्सिंगबाबत एक प्रकरण समोर आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी संबंधित ही घटना आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची आतील माहिती देण्यास सांगितले.’ सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला दिली. बीसीसीआयने भ्रष्टाचाराबाबत कडक आचारसंहिता बनवली आहे. कोणत्याही खेळाडूने किंवा अधिकाऱ्याने बुकीशी संपर्क साधल्याची माहिती बीसीसीआयला दिली नाही, तर बोर्ड त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते.
ड्रायव्हरने सिराजशी साधला संपर्क
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ‘गेल्या सामन्यात सट्टेबाजीदरम्यान बरेच पैसे गमावल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीला (जो ड्रायव्हर आहे) सिराजकडून संघातील माहिती हवी होती. त्या व्यक्तीने सिराजला फोन केला. मात्र यानंतर सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही माहिती दिली. तो बुकी नव्हता. हा हैदराबादचा ड्रायव्हर आहे ज्याला आयपीएल सामन्यांदरम्यान पैसे खर्च करण्याची सवय आहे. सट्टेबाजीत त्याने बरेच पैसे गमावले आहेत. त्यामुळेच त्यांनी सिराजशी संपर्क साधून संघाची आतील माहिती देण्यास सांगितले.
Match-fixing in #IPL2023?
Star player approached for 'inside information' on #RCB
READ here!https://t.co/6b04msc7rn
— DNA (@dna) April 19, 2023
हेही वाचा – Horoscope Today : ‘या’ राशींना आज मिळणार भाग्याची साथ..! जाणून घ्या राशीभविष्य
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, की सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या घटनेची माहिती दिली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!