IPL 2023 पूर्वी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स टीममधून ‘ब्रेकिंग’ न्यूज!

WhatsApp Group

Mahela Jayawardene : मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेनं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तो यापुढे IPL 2023 मध्ये संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार नाही. त्याच्याकडं मुंबई इंडियन्स गटात नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आता जयवर्धनेकडं मुंबई इंडियन्स गटातील तीन संघांची कामगिरी सुधारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. IPL व्यतिरिक्त, मुंबई फ्रँचायझीकडं आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये MI Emirates आणि दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये MI केपटाऊनचा संघ आहे. या त्रिकुटाची कामगिरी सुधारण्यासाठी जयवर्धने काम करेल. त्याच्यासोबत झहीर खानला क्रिकेट विकास विभागाचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. झहीर तिन्ही संघांतील खेळाडूंना सुधारण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी काम करेल.

मुंबई इंडियन्सनं म्हटलं आहे की, कंपनीच्या विस्तारामुळे संघ व्यवस्थापनाला शीर्ष स्तरावर केंद्रीय संघाची गरज भासू लागली. यामुळे खेळाडूंमध्ये नैतिकता, मूल्ये आणि शिकण्याची क्षमता विकसित होईल. या कारणांमुळे मुंबईचा संघ जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट ब्रँड बनला आहे. जयवर्धने २०१७ मध्ये मुंबईचा मुख्य प्रशिक्षक झाला आणि ते आतापर्यंत या पदावर आहेत. यादरम्यान संघ तीन वेळा चॅम्पियन झाला. त्यांच्या राजीनाम्यानंतर लवकरच नवीन प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येणार आहे. या पदोन्नतीला “संपूर्ण सन्मान” असं वर्णन करताना, जयवर्धने म्हणाला की, “क्रिकेटचा एक मजबूत एकसंध जागतिक ब्रँड तयार करण्याच्या या नवीन जबाबदारीसाठी मी उत्सुक आहे”.

हेही वाचा – Hindi Diwas 2022 : हे वाचलंय का..? भारताव्यतिरिक्त ‘या’ ५ देशात हिंदी भाषा बोलली जाते!

आता मुंबई इंडियन्स नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाउचर कोणत्याही आयपीएल संघात मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील होऊ शकतो, असं मानलं जात आहे. कदाचित तो फक्त मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे. पंजाब किंग्ज संघाचंही मुख्य प्रशिक्षकपदही रिक्त आहे. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मुंबई १४ पैकी फक्त ४ सामने जिंकू शकली आणि पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होती.

IPL 2022 मध्ये मुंबईचे मोठे खेळाडू काही खास करू शकले नाहीत. रोहितसह असे अनेक खेळाडू आहेत जे संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकले नाहीत किंवा विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकले नाहीत. मुंबईच्या खराब कामगिरीमागे संघातील बड्या खेळाडूंचा फ्लॉप हेही महत्त्वाचं कारण आहे. या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप १० खेळाडूंची यादी पाहिली तर सध्या या यादीत मुंबईचा एकही खेळाडू नाही.

मुंबईच्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीही खराब झाली. IPL 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप २० गोलंदाजांची यादी पाहिली तर त्यात मुंबईचा एकही गोलंदाज नाही. जसप्रीत बुमराह संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यानं १३ सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. तर डॅनियल सॅम्सनं १० सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय अन्य कोणत्याही गोलंदाजाची कामगिरी विशेष झाली नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment