IPL 2023 : मुंबई इंडियन्सला 6 बॉल 11 रन्स डोईजड..! मोहसीन खाननं झुकवलं; ग्रीन-डेव्हिड फेल!

WhatsApp Group

IPL 2023 LSG vs MI : आयपीएल 2023 हंगामात मंगळवारी (16 मे) मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत सामन्यात रोमांच कायम राहिला आणि अखेरीस क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने सामना जिंकून मुंबईचा 5 धावांनी पराभव केला.
178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 19 व्या षटकापर्यंत या सामन्यात टिकून राहिला. अखेरच्या षटकात लखनऊचा संघ हा पराभवाचा सामना उलथवून टाकेल, असे कुणालाही वाटले नव्हते. या विजयाचा खरा हिरो ठरला वेगवान गोलंदाज मोहसीन खान, ज्याने शेवटच्या षटकात मॅच फिरवली.

शेवटच्या षटकात मुंबई संघाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्यानंतर लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्याने मोहसीनकडे चेंडू सोपवला. कॅमेरून ग्रीन स्ट्राइकवर तर टीम डेव्हिड नॉन स्ट्राइकवर होता. तोपर्यंत डेव्हिडने 17 चेंडूत 29 धावा केल्या. मात्र मोहसीनने आपल्या रणनीती आणि शैलीनुसार गोलंदाजी करत दोन्ही फलंदाजांना रोखले.

हेही वाचा – IPL 2023 : जेव्हा खुद्द गावसकर धोनीकडे ऑटोग्राफ मागतात..! Video पाहाल तर इमोशनल व्हाल

मोहसीनने या षटकात केवळ 5 धावा देत सामन्याचे चित्र फिरवले. अशा प्रकारे लखनऊने हा सामना 5 धावांनी जिंकला. मुंबईचा संघ 5 विकेटवर केवळ 172 धावाच करू शकला आणि सामना गमावला. या सामन्यात इशान किशनने 39 चेंडूत सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने 25 चेंडूत 37 धावा केल्या. अखेरीस, टीम डेव्हिडने क्रिझवर थांबून 19 चेंडूत 32 धावांची खेळी खेळली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लखनऊकडून यश ठाकूर आणि रवी बिश्नोईने 2-2, तर मोहसीन खानने 1 बळी घेतला.

शेवटच्या षटकातील थरार!

  • पहिला चेंडू : कॅमेरून ग्रीनला एकही धाव करता आली नाही.
  • दुसरा चेंडू : कॅमेरून ग्रीनने 1 धाव घेतली.
  • तिसरा चेंडू : टिम डेव्हिडने 1 धाव घेतली.
  • चौथा चेंडू : कॅमेरून ग्रीनला एकही धाव करता आली नाही.
  • पाचवा चेंडू : कॅमेरून ग्रीनने 1 धाव घेतली.
  • सहावा चेंडू : टीम डेव्हिडने 2 धावा केल्या.

हा सामना लखनऊमध्ये खेळला गेला, जिथे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लखनऊ संघाने 3 बाद 177 धावा केल्या. स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने लखनऊसाठी 47 चेंडूत 89 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. स्टॉइनिसने आपल्या झंझावाती खेळीत 8 षटकार आणि 4 चौकार लगावले. त्याच्याशिवाय कर्णधार कृणाल पांड्या 42 चेंडूत 49 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने 2 आणि पीयुष चावलाने 1 बळी घेतला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment