IPL 2023 LSG vs GT : आयपीएल 2023 मध्ये आज रंगलेल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्याक गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 7 धावांनी पराभव केला. लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊला विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांना 7 विकेट्सच्या मोबदल्यात 128 धावाच करता आल्या. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला मोहित शर्मा. मोहितने अखेरच्या षटकात लखनऊला 12 धावा करू दिल्या नाहीत. या विजयानंतरही गुणतालिकेत गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
शेवटच्या षटकात 4 विकेट्स!
लखनऊला शेवटच्या षटकात 12 धावा हव्या होत्या. पण या षटकात लखनऊने कप्तान केएल राहुल (68), मार्कस स्टॉइनिस (0), आयुष बदोनी (8), दीपक हुडा (2) यांना गमावले सोबत सामनाही गुजरातच्या झोळीत दिला. यापैकी मोहितने राहुल आणि स्टॉइनिसला बाद केले. तर दीपक आणि आयुष धावबाद झाले. लखनऊला संथ फलंदाजीचा फटका बसला.
TAKE. A. BOW Mohit Sharma 🫡🫡
A sensational final over that!
Follow the match ▶️ https://t.co/TtAH2CiXVI#TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/PnQAVz3kuy
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
मोहित शर्माने 3 षटकात 17 धावा देत 2 बळी घेतले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मोहित शर्मा चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये परतला. मोहित 34 वर्षीय मोहितने 26 एकदिवसीय आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 37 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा – आता भारतीय सेनेतही इलेक्ट्रिक कार..! आली नवी जिप्सी; पळणार ‘इतकी’ किमी
शेवटच्या षटकात राहुल बाद झाला आणि…
एके काळी सामना एक-दोन षटके आधीच संपेल असे वाटत होते, पण गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत अखेरच्या षटकात सामना बरोबरीत आणला. शेवटच्या षटकात केएल राहुलने मोहित शर्माच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या, तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसही चालत राहिला. चौथ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना आयुष बदोनी धावबाद झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर दीपक हुडा दुसऱ्या धावेवर धावबाद झाला. शेवटच्या चेंडूवर एकही धाव झाली नाही.
सामन्याचे शेवटचे षटक
- पहिला चेंडू – 2 धावा (केएल राहुल)
- दुसरा चेंडू – विकेट (केएल राहुल)
- तिसरा चेंडू – विकेट (मार्कस स्टॉइनिस)
- चौथा चेंडू – 1 धाव + आयुष बडोनी धावबाद
- पाचवा चेंडू – 1 धाव + दीपक हुडा धावबाद
- सहावा चेंडू – 0 धावा (रवी बिश्नोई)
संक्षिप्त धावफलक
- टॉस – गुजरात (फलंदाजी)
- गुजरात टायटन्सचा डाव – 135/6 (हार्दिक पंडया 66, वृद्धिमान साहा 47, कृणाल पंड्या 16/2, मार्कस स्टॉइनिस 20/2)
- लखनऊ सुपरजायंट्सचा डाव – 128/7 (केएल राहुल 68, मोहित शर्मा 17/2, नूर एहमद 18/2)
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!