IPL 2023 KKR vs RR Yashasvi Jaiswal vs Nitish Rana : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने गुरुवारी आयपीएल 2023 च्या 56व्या सामन्यात पहिल्याच षटकात आपल्या फलंदाजीने कहर केला. कोलकाताच्या इडन गार्डन्सवरील या सामन्यात नितीश राणाने पहिले षटक टाकले. या षटकात यशस्वी जयस्वालने 26 धावा केल्या.
फिरकीला पोषक ठरणारी खेळपट्टी पाहून नितीशने पहिले षटक टाकण्याचा विचार केला. पण त्याचा हा निर्णय साफ चुकला. यशस्वीने त्याच्या पहिल्या षटकात 6, 6, 4, 4, 2, 4 अशा धावा कुटल्या. आयपीएल 2023 मधील 56व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा धुव्वा उडवला. राजस्थानने 9 गड्यांनी विजय नोंदवला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने 13.1 षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.
नितीश राणाचे पहिले षटक पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
🔥 The second-most expensive first over in IPL history
💥 Only the second time that an IPL innings began with two sixesYashasvi Jaiswal smashed 26 runs off Nitish Rana 🤯 https://t.co/JKHWK0gVQz #IPL2023 #KKRvRR pic.twitter.com/XNURhTtQWo
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 11, 2023
हेही वाचा – IPL 2023 : तुफान आलया..! यशस्वी जयस्वालमुळे KKR बेचिराख; राजस्थानचा सहज विजय
Bro came to bowl first over in the overconfidence & got hit for 26 runs.
wtf Nitish Rana 🤷♂️😂 pic.twitter.com/ZMISLyejST
— BALA (@erbmjha) May 11, 2023
यशस्वीचे विक्रमी अर्धशतक
या सामन्यात यशस्वी जयस्वालने खास विक्रम केला. त्याने केवळ 13 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला. यापूर्वी हा विक्रम केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर संयुक्तपणे नोंदवला गेला होता. तसे, यशस्वी जयस्वालने T20 क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे, ज्याने 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!