IPL 2023 KKR vs RR Yashasvi Jaiswal Fastest 50 : आयपीएलच्या 56व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडला आहे. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्ससमोर जयस्वालने तुफानी फटकेबाजी करत फक्त 13 चेंडूत अर्धशतक ठोकले. राजस्थानने पहिल्या तीन षटकांतच एका विकेटच्या मोबदल्यात 54 धावा केल्या. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या.
कोलकाताकडून पहिले षटक कप्तान नितीश राणाने टाकले. यशस्वीने त्याच्या षटकात 6, 6, 4, 4, 2, 4 अशी मारहाण करत 26 धावा काढल्या. जलद अर्धशतकाच्या विक्रमात जयस्वालने केएल राहुलचा विक्रम मोडला. 2018 मध्ये, किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून खेळताना, राहुलने मोहालीमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते.
The Yashasvi effect❤️🔥 – FASTEST 50 in #TATAIPL history!! 🤯💪#KKRvRR #IPL2023 #IPLonJioCinema | @rajasthanroyals @ybj_19 pic.twitter.com/WgNhYJQiUN
— JioCinema (@JioCinema) May 11, 2023
हेही वाचा – आपण विमानात थर्मामीटर घेऊन प्रवास करू शकतो का? जाणून घ्या काय होईल!
Fastest FIFTY in the IPL
Yashasvi Jaiswal brings up his half-century in just 13 deliveries 👏👏#TATAIPL #KKRvRR pic.twitter.com/KXGhtAP2iy
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
कोलकाताच्या 149 धावा
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना कोलकाता नाइट रायडर्सला 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांवर रोखले. राजस्थानला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य मिळाले. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले. संदीप शर्मा आणि केएम आसिफ यांना प्रत्येकी एक यश मिळाले. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार नितीश राणाने 22, रहमानउल्ला गुरबाजने 18, रिंकू सिंहने 16, आंद्रे रसेल आणि जेसन रॉयने 10-10 धावा केल्या.
आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक (चेंडू)
- 13 – यशस्वी जयस्वाल (RR) विरुद्ध KKR, कोलकाता, 2023
- 14 – केएल राहुल (PBKS) विरुद्ध DC, मोहाली, 2018
- 14 – पॅट कमिन्स (KKR) विरुद्ध MI, पुणे, 2022
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!