IPL 2023 KKR vs RR : आयपीएल 2023 मधील 56व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा धुव्वा उडवला आहे. राजस्थानने 9 गड्यांनी विजय नोंदवला. या सामन्यात हिरो ठरला राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल. त्याने वेगवान अर्धशतकाचा विक्रम करत नाबाद 98 धावा चोपल्या. टॉस गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने 13.1 षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानचे आता 12 गुण झाले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
कोलकाताच्या 149 धावा
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना कोलकाता नाइट रायडर्सला 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांवर रोखले. राजस्थानला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य मिळाले. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले. संदीप शर्मा आणि केएम आसिफ यांना प्रत्येकी एक यश मिळाले. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार नितीश राणाने 22, रहमानउल्ला गुरबाजने 18, रिंकू सिंहने 16, आंद्रे रसेल आणि जेसन रॉयने 10-10 धावा केल्या.
Moooood when you smash the fastest IPL fifty!!! 🔥🔥🔥 pic.twitter.com/n1oKPDvgi5
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 11, 2023
हेही वाचा – IPL 2023 : फक्त 13 चेंडूत 50 रन्स..! यशस्वी जयस्वालने रचला इतिहास; पाहा Video
Star Sports brand ambassador watching match on Jio Cinema. Because Yashasvi Jaiswal deserves to be viewed in 4K pic.twitter.com/xAlnNMkCZ6
— Sagar (@sagarcasm) May 11, 2023
प्रत्युत्तरात राजस्थानकडून जोस बटलर शून्यावर धावबाद झाला. पण यशस्वी जयस्वाल आणि कप्तान संजू सॅमसनने तुफानी फटकेबाजी केली. यशस्वीने 47 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 98 धावा केल्या. संजू सॅमसनने 29 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 48 धावा केल्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!