IPL 2023 : ना फर्स्ट क्लास मॅच, ना लिस्ट-ए क्रिकेट… RCB ची बँड वाजवणारा सुयश शर्मा कोण?

WhatsApp Group

IPL 2023 Suyash Sharma : आयपीएलमध्ये, गुरुवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (KKR vs RCB) त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर 81 धावांनी जोरदार विजय नोंदवला. केकेआरच्या या विजयाचा हिरो ठरला शार्दुल ठाकूर, ज्याने अवघ्या 29 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी, या सामन्यात केकेआरच्या युवा फिरकीपटूने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने बरीच चर्चा केली. सुयश शर्मा असे या 19 वर्षीय युवा गोलंदाजाचे नाव असून त्याने पदार्पणाच्या सामन्यातच 3 बळी घेतले. ही अप्रतिम कामगिरी पाहून अनेक दिग्गज खेळाडू या युवा गोलंदाजाला भारताचा नवा ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणत आहेत.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 204 धावा केल्या. त्यानंतर सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरिन या त्रिकुटाने आरसीबीला केवळ 123 धावांत गुंडाळले. सुयश शर्मा सामन्यापूर्वी केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, परंतु कर्णधार नितीश राणाने त्याला आरसीबीच्या डावात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवले. त्यानंतर सुयशने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि 4 षटकात 30 धावांत 3 बळी घेतले, ज्यात दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा यांच्या विकेट्सचा समावेश होता.

हेही वाचा – कच्च्या फळांचा रंग हिरवाच का असतो? अनेकांना माहीत नाही कारण!

कोण आहे सुयश शर्मा?

केकेआरने सुयश शर्माला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर त्यांच्या टीममध्ये समाविष्ट केले होते. IPL 2023 मिनी-लिलावात सुयश शर्माला विकत घेतल्यानंतर KKR चे CEO वेंकी म्हैसूर म्हणाले होते की त्यांनी स्पिनरसाठी जास्त बजेट ठेवले होते, परंतु त्यांना तो फक्त 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर मिळाला. वेंकी म्हैसूर यांनी सांगितले होते की सुयशला KKR स्काउटने शोधले होते, ज्यांनी त्याला अंडर-25 सामन्यादरम्यान पाहिले होते. दिल्लीच्या सुयशचा स्पर्धात्मक क्रिकेटमधील हा पहिला टी-20 सामना होता. याआधी तो एकही टी-20 सामना खेळला नाही किंवा लिस्ट ए किंवा फर्स्ट क्लास मॅचही खेळला नाही. तो दिल्लीच्या अंडर-25 संघाकडून खेळतो जिथून केकेआरने त्याला आणले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment