IPL 2023 : शुबमन गिलच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सचं पाणी पाणी! 234 रन्सचं टार्गेट

WhatsApp Group

IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : आयपीएल 2023 मध्ये आज क्वालिफायर 2 चा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगत आहे. या सामन्यात जो जिंकेल, तो फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजेतेपदासाठी खेळेल. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने मुंबईला चोपले. त्याने दमदार शतक ठोकत 129 धावांची जबरदस्त खेळी केली.

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या मुंबईचा निर्णय सपशेल अपयशी ठरला. शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 54 धावा फलकावर लावल्यानंतर पीयुष चावलाने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र शुबमनने साई सुदर्शनला सोबत घेत संघाला दोनशेपारच पोहोचवले. दरम्यान शुबमनने यंदाच्या हंगामातील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. 17व्या षटकात आकाश मधवालने त्याला बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्या (28) आणि राशिद खान यांनी शेवटपर्यंत फटकेबाजी केली. 20 षटकात गुजरातने 3 बाद 233 धावा केल्या.

हेही वाचा – एका मोबाईलसाठी धरणातील 21 लाख लिटर पाणी उपसलं! अधिकारी निलंबित

आयपीएल हंगामातील सर्वाधिक शतके

  • 4 – विराट कोहली (RCB, 2016)
  • 4 – जोस बटलर (RR, 2022)
  • 3 – शुबमन गिल (GT, 2023)

सर्वाधिक आयपीएल धावसंख्या (भारतीय फलंदाज)

  • 132* – केएल राहुल (PBKS) विरुद्ध RCB, दुबई, 2020
  • 129 – शुबमन गिल (GT) विरुद्ध MI, अहमदाबाद, 2023
  • 128* – ऋषभ पंत (DC) विरुद्ध SRH, दिल्ली, 2018
  • 127 – मुरली विजय (CSK) विरुद्ध RR, चेन्नई, 2010

IPL प्लेऑफमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

  • 129 – शुबमन गिल (GT) विरुद्ध MI, अहमदाबाद, 2023 Q2
  • 122 – वीरेंद्र सेहवाग (PBKS) विरुद्ध CSK, मुंबई WS, 2014 Q2
  • 117* – शेन वॉटसन (CSK) विरुद्ध SRH, मुंबई WS, 2018 फायनल
  • 2014* – वृद्धिमान साहा (PBKS) विरुद्ध KKR, बंगळुरू, 2014 फायनल

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment