IPL 2023 : मुंबईचा गुजरातकडून लाजिरवाणा पराभव..! रोहित, किशन, तिलक फ्लॉप

WhatsApp Group

IPL 2023 GT vs MI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 55 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला आपल्या सुमार गोलंदाजीचा फटका बसला. टॉस हरलेल्या गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 207 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावांपर्यंत पोहोचता आले.

गुजरातच्या आव्हानाचा पाठललाग करताना मुंबईकडून इशान किशन (13) आणि रोहित शर्मा (2) यांना चांगली सलामी देता आली नाही. त्यानंतर आलेल्या कॅमेरून ग्रीनने 33 धावांची खेळी केली. फॉर्मात असलेला तिलक वर्मा इम्पॅक्ट खेळाडू मैदानात फलंदाजीला आला. पण त्याला 2 धावाच करता आल्या. गुजरातचे फिरकीपटू राशिद खानने 2 आणि नूर अहमदने 3 बळी घेत मुंबईच्या डावाला सुरुंग लावला. अवघ्या 59 धावात मुंबईने 5 फलंदाज गमावले. मुंबईचा युवा खेळाडू नेहल वधेराने 21 चेंडूत 40 धावा करत झुंज दिली पण तोपर्यंत उशीर झाला होता. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने  2 बळी घेतले.

हेही वाचा – तरुणांना पार्टी, मजा करण्यासाठी सरकार देतं महिन्याला 40,000 रुपये! कारण आहे गंभीर

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांचे लक्ष्य ठेवले . गुजरात संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 207 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील गुजरात टायटन्सची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी या संघाने या मोसमात कोलकाताविरुद्ध 204 धावा केल्या होत्या. या सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या सहा षटकात 94 धावा केल्या. शुबमन गिलने सर्वाधिक 56 धावा केल्या. डेव्हिड मिलरने 46 आणि अभिनव मनोहरने 42 धावा केल्या. मुंबईकडून पीयुष चावलाने दोन बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा, शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, पीयुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment