IPL 2023 GT vs LSG Rashid Khan Catch : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा जादुई लेग-स्पिनर राशिद खान त्याच्या भयानक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. समोर फलंदाजी करताना मोठ्या खेळाडूंचे पाय थरथर कापतात. पण राशिद जितका चांगला गोलंदाज आहे तितकाच अप्रतिम क्षेत्ररक्षकही आहे. क्षेत्ररक्षण करताना तो संपूर्ण झोकून देतो. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. राशिदने असा झेल घेतला की सगळेच थक्क झाले. त्याच्या या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
लखनऊ सुपर जायंट्सच्या वतीने वेगवान गोलंदाज मोहित शर्मा गुजरात टायटन्सच्या डावातील 9 वे षटक टाकत होता. काइल मायर्स त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. मोहितने मायर्सला एक आखुड टप्प्याचा चेंडू टाकला, ज्याने स्लॅप शॉट मारला आणि चेंडू हवेत गेला.
हेही वाचा – IPL 2023 : साहानं फोडलं, गिलनं तोडलं, गुजरातनं लखनऊला झोड झोड झोडलं!
मायर्सला चेंडूला योग्य वेळ देता आला नाही, त्यामुळे चेंडू दास्त वेळ हवेत राहिला. अशा स्थितीत सीमारेषेवर तैनात असलेल्या राशिद खानने 26 मीटर धावत डायव्हिंग करत अविश्वसनीय झेल घेतला. त्याचा झेल इतका जबरदस्त होता की कोणाचाही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आता या झेलमुळे त्याचे जोरदार कौतुक होत आहे.
Exceptional grab 😎
The @gujarat_titans needed a special effort to break the opening partnership & @rashidkhan_19 does exactly that 🙌#TATAIPL | #GTvLSG pic.twitter.com/ldRQ5OUae8
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
विराटकडूनही कौतुक!
भारतीय क्रिकेट संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीही राशिद खानच्या या झेलचा चाहता झाला. त्याने सोशल मीडियाच्या सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर राशिद खानसाठी एक स्टोरी देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये कोहलीने लिहिले आहे की तो आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट कॅचपैकी एक होता.
Instagram story by Virat Kohli about the catch of Rashid. pic.twitter.com/rSPkwl3Kiw
— Johns. (@CricCrazyJohns) May 7, 2023
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!