IPL 2023 : साहानं फोडलं, गिलनं तोडलं, गुजरातनं लखनऊला झोड झोड झोडलं!

WhatsApp Group

IPL 2023 GT vs LSG : आयपीएल 2023 मध्ये आज 51वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन सख्ख्या भावांमध्ये खेळला गेला. यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने कृणाल पांड्याच्या लखनऊ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. या सामन्यात हिरो ठरले गुजरातचे सलामीवीर वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल. दोघांनी दे-दणादण फटकेबाजी करत संघाला दोनशेपार धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात कमाल योगदान दिले.

गुजरातची दमदार फलंदाजी

टॉस गमावलेल्या गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी 141 धावांची दमदार सलामी दिली. साहाने पॉवरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी करत फक्त 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. तो 13व्या षटकात बाद झाला. त्याने 10 चौकार आणि 4 षटकारांसह 81 धावा केल्या. त्यानंतर गिलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. कप्तान हार्दिक पंड्याने झटपट 25 धावा जोडल्या. मोहसिन खानने त्याला कृणाल पंड्याकरवी झेलबाद केले. 18व्या षटकात गुजरातने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. डेव्हि़ मिलरनेही (नाबाद 21) चांगले योगदान दिले. 20 षटकात गुजरातने 2 बाद 227 धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2023 : “तो मला शिव्या…” मोहम्मद सिराजसोबतच्या भांडणावर सॉल्टचा खुलासा!

प्रत्युत्तरात लखनऊकडून क्विंटन डी कॉक आणि काइल मेयर्स यांनीही चांगली सुरुवात केली. डी कॉकने 7 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावांची खेळी केली, तर मेयर्स 48 धावांवर तंबूत परतला. मोहित शर्माने मेयर्सला तर राशिद खानने डी कॉकला बाद केले. यानंतर लखनऊची गाडी रुळावरून घसरली. लखनऊला 20 षटकात 7 बाद 171 धावांपर्यंत पोहोचता आले. गुजरातकडून मोहितने सर्वाधिक 4 बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment