IPL 2023 GT vs DC Mohammed Shami 4 Wickets Spell : गुजरात टायटन्सचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दिल्ली कॅपिटल्सची भंबेरी उडवली आहे. शमीने आपल्या स्पेलच्या 24 चेंडूत असा कहर केला की डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने पॉवरप्लेमध्येच शरणागती पत्करली. शमीने 4 षटकात केवळ 11 धावा देत 4 विकेट्स काढल्या.
आयपीएल 2023 मध्ये मोहम्मद शमी उत्कृष्ट लयीत गोलंदाजी करत आहे. दिल्लीविरुद्ध त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फिलिप सॉल्टला बाद करून दिल्लीला बॅकफूटवर आणले. यानंतर दिल्लीची ट्रेन रुळावरून घसरली.
मोहम्मद शमीचा स्पेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
🤯🤯🤯 – It's all happening in #GTvDC
A double-quick blow for @DelhiCapitals in the first two overs 👀 #GTvDC #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/IFmx34UvLQ
— JioCinema (@JioCinema) May 2, 2023
What a spell this from @MdShami11 🤯🤯
He finishes his lethal spell with figures of 4/11 😎
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/85KNVfYXEf
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
हेही वाचा – Hero घेऊन येतेय ‘स्वस्त’ बाइक..! मिळेल 60 किमीचं मायलेज; जाणून घ्या किंमत
मोहम्मद शमीने आपल्या 4 षटकांमध्ये अशी गोलंदाजी केली ज्यानंतर दिल्लीला सामन्यात पुनरागमन करणे अत्यंत कठीण गेले. शमीने प्रियम गर्ग, रायली रुसो आणि मनीष पांडे यांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या तीन विकेट्समध्ये यष्टीरक्षक साहाचे महत्त्वाचे योगदान ठरले. शमी आता आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला असून त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे.
Question – you wanted to bowl a few more overs tonight the way you were going?
Mohammad Shami – not at all, my all petrol was finished (laughs). pic.twitter.com/GqntN3YO8k
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2023
दिल्ली कॅपिटल्सची भंबेरी!
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शमीची भन्नाट गोलंदाजी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ मोलाची ठरली. दिल्लीला 20 षटकात 8 बाद 130 धावा करता आल्या. दिल्लीकडून अमन खानने 51 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहित शर्माने 2 बळी घेतले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!