IPL 2023 : इशांत शर्माचा भन्नाट ‘नकल’ बॉल, विजय शंकर क्लीन बोल्ड! पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 GT vs DC : आयपीएल 2023चा 44 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (GT vs DC) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इशांत शर्माने आपल्या भन्नाट गोलंदाजीने सर्वांना थक्क केले. इशांतने गुजरातचा फॉर्मात असलेल्या विजय शंकर आणि राहुल तेवतियाला बाद केले. विजय शंकरची विकेट इशांतसाठी खास ठरली. त्याने ज्या चेंडूवर विजयला बाद केले, त्या चेंडूचे सर्वजण कौतुक करत आहेत.

इशांतने विजय शंकरला क्लीन बोल्ड केले. त्याने टाकलेला नकल बॉल विजयला काही कळायच्या आत स्टम्प्सवर आदळला. दक्षिण आफ्रितकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही इशांतच्या या नकल बॉलचे कौतुक केले.

असा रंगला सामना..

या सामन्यात दिल्लीचा कप्तान डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मोहम्मद शमीची भन्नाट गोलंदाजी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ मोलाची ठरली. दिल्लीला 20 षटकात 8 बाद 130 धावा करता आल्या. दिल्लीकडून अमन खानने 51 धावांची खेळी केली. गुजरातकडून शमीने 4 षटकात केवळ 11 धावा देत 4 विकेट्स काढल्या. मोहित शर्माने 2 बळी घेतले.

हेही वाचा – IPL 2023 : 11 धावांत 4 विकेट्स..! मोदी स्टेडियमवर मोहम्मद शमीचा कहर; पाहा Video

प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवातही खराब झाली. दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने वृद्धिमान साहाला खातेही खोलू दिले नाही. तर एनरिक नॉर्कियाने शुबमन गिलला (6) स्वस्तात तंबूत पाठवले. विजय शंकरला (6) इशांत शर्माने नकल बॉलवर फसवले. डेव्हिड मिलर खातेही खोलू शकला नाही. कप्तान हार्दिक पंड्याने एका बाजूने किल्ला लढवला पण त्याला विजय देता आला नाही. त्याने 7 चौकारांसह 59 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून खलील आणि इशांतने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. गुजरातला 20 षटकात 6 बाद 125 धावांपर्यंतच पोहोचता आले. दिल्लीने 5 धावांनी विजय मिळवला.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment