IPL 2023 GT vs DC : आयपीएल 2023 मध्ये पुन्हा एकदा कमी धावसंख्येचा भन्नाट सामना पाहायला मिळाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा फक्त 5 धावांनी पराभव केला. दिल्लीसाठी हिरो ठरला इशांत शर्मा. गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती. अर्धशतकवीर हार्दिक पंड्या आणि स्फोटक राहुल तेवतिया खेळपट्टीवर होते. पण इशांतने आपल्या अनुभवाचा पुरेपुर वापर करत तेवतियाला बाद केले आणि फक्त 6 धावा दिल्या. यासह दिल्लीने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे.
दिल्ली कॅपिटल्सची भंबेरी!
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीची भन्नाट गोलंदाजी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ मोलाची ठरली. दिल्लीला 20 षटकात 8 बाद 130 धावा करता आल्या. दिल्लीकडून अमन खानने 51 धावांची खेळी केली. गुजरातकडून शमीने 4 षटकात केवळ 11 धावा देत 4 विकेट्स काढल्या. मोहित शर्माने 2 बळी घेतले.
A resounding away victory for @DelhiCapitals 🥳🥳#DC was full of belief tonight and they register a narrow 5-run win in Ahmedabad 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/VQGP7wSZAj#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/GWGiTIshFY
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
When the whole Delhi 𝐑𝐎𝐀𝐑𝐄𝐃 🔥 pic.twitter.com/AoGv9IPBZ2
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 2, 2023
हेही वाचा – IPL 2023 : 11 धावांत 4 विकेट्स..! मोदी स्टेडियमवर मोहम्मद शमीचा कहर; पाहा Video
Hardik Pandya said "I should have finished the game, full ownership of the loss is in me". pic.twitter.com/yAFhroybZC
— Johns. (@CricCrazyJohns) May 2, 2023
गुजरातकडूनही निराशा!
प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवातही खराब झाली. दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने वृद्धिमान साहाला खातेही खोलू दिले नाही. तर एनरिक नॉर्कियाने शुबमन गिलला (6) स्वस्तात तंबूत पाठवले. विजय शंकरला (6) इशांत शर्माने नकल बॉलवर फसवले. डेव्हिड मिलर खातेही खोलू शकला नाही. कप्तान हार्दिक पंड्याने एका बाजूने किल्ला लढवला पण त्याला विजय देता आला नाही. त्याने 7 चौकारांसह 59 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून खलील आणि इशांतने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. गुजरातला 20 षटकात 6 बाद 125 धावांपर्यंतच पोहोचता आले.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!