IPL 2023 : चेन्नईने पाचवी ट्रॉफी जिंकल्यावर रोहित शर्मा म्हणतो, “यावर्षी काय आयपीएल….”

WhatsApp Group

IPL 2023 Final Rohit Sharma On CSK : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमहर्षक फायनलमध्ये सीएसकेने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. 25 चेंडूत 47 धावा करणारा डेव्हॉन कॉनवे सामनावीर ठरला. CSK ला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा हव्या होत्या. रवींद्र जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सीएसकेला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवले. यासह कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सर्वाधिक आयपीएल जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत रोहितची बरोबरी केली.

रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. आता धोनीनेही चेन्नईला पाचवेळा चॅम्पियन बनवले आहे. चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावले होते. चेन्नईच्या पाचव्या जेतेपदानंतर रोहित शर्माने ट्वीट केले आहे. तो म्हणाला, ”या वर्षी काय आयपीएल झालीय. त्यामुळे अनेक अद्भुत टॅलेंट समोर आले. जेतेपद जिंकल्याबद्दल चेन्नईला खूप खूप शुभेच्छा आणि स्पर्धेत सातत्याने चांगला खेळ केल्याबद्दल गुजरात टायटन्सचे अभिनंदन.”

हेही वाचा – WTC Final : आयपीएल संपलं, ट्रॉफी गेली, आता रोहित शर्माला ‘महारेकॉर्ड’ करण्याची संधी

15 षटकात 171 धावा

रिझर्व्ह डेवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. साई सुदर्शनने 47 चेंडूत 96 धावा केल्या. पावसामुळे चेन्नईला 15 षटकांत 171 धावा करता आल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

 

Leave a comment