IPL 2023 Final GT vs CSK Ravindra Jadeja : आयपीएल 2023 मध्ये चाहत्यांना चित्तथरारक अंतिम सामना पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान कोण जिंकेल हे शेवटच्या षटकापर्यंत समजत नव्हते. मोहित शर्माने विजयाचा घास गुजरातच्या तोंडाजवळ नेला होता, पण रवींद्र जडेजाने दोन चेंडूत सामना पालटला. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 13 धावा हव्या होत्या. त्यानंतर काय घडले वाचा..
मोहित शर्माचे 20वे षटक
- पहिला चेंडू – निर्धाव
- दुसरा चेंडू – एक धाव
- तिसरा चेंडू – एक धाव
- चौथा चेंडू – एक धाव
- पाचवा चेंडू – षटकार
- सहावा चेंडू – चौकार
तब्बल 30 तास रंगलेल्या या फायनलमध्ये चाहत्यांचाही खूप मोठा पाठिंबा पाहायला मिळाला. पावसामुळे सामना मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिला, पण चाहत्यांचे प्रेम कायम राहिले.
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
Two shots of excellence and composure!
Finishing in style, the Ravindra Jadeja way 🙌#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/EbJPBGGGFu
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
हेही वाचा – IPL 2023 Final : धोनी जिंकला…! जडेजाच्या पराक्रमामुळे CSK ला पाचवे विजेतेपद
या सामन्यात गुजरातने 215 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार हे लक्ष्य 15 षटकांत 171 धावांवर कमी करण्यात आले. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने 5 विकेट्सवर 171 धावा करत सामना जिंकला. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने 25 चेंडूत सर्वाधिक 47 धावा केल्या. शिवम दुबेने 32 आणि अजिंक्य रहाणेने 27 धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 बळी घेतले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!