IPL 2023 Final MS Dhonis Stumping To Shubman Gill : आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी (GT vs CSK) होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, 28 मेचा दिवस पावसाने वाहून गेला. आता हा सामना आज राखीव दिवशी खेळला जात आहे. रविवारी पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गुजरातला पहिला धक्का सातव्या षटकात बसला. शुबमन गिल धोनीच्या शानदार स्टम्पिंगचा बळी ठरला. रवींद्र जडेजा सातव्या षटकात गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शुबमन गिलचा पाय बाहेर आला. 0.12 सेकंदाच्या रिअॅक्शन टाइममध्ये 41 वर्षीय धोनीने शुबमनला स्टंप केले. त्याला 20 चेंडूत 39 धावा करता आल्या. शुबमनने आपल्या खेळीत सात चौकार मारले. चार धावांवर असताना दीपक चहरनेही त्याचा झेल सोडला. मात्र, धोनीसमोर त्याचे काही चालले नाही.
हेही वाचा – IPL 2023 : रिंकू सिंह घरी परतला, फॅन्स आशिर्वाद घेण्यासाठी धावले, मग पुढे…
Lightning fast MSD! ⚡️ ⚡️
How about that for a glovework 👌 👌
Big breakthrough for @ChennaiIPL as @imjadeja strikes! 👍 👍#GT lose Shubman Gill.
Follow the match ▶️ https://t.co/WsYLvLrRhp #TATAIPL | #Final | #CSKvGT | @msdhoni pic.twitter.com/iaaPHQFNsy
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
दोन्ही संघ
गुजरात टायटन्स : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कप्तान/विकेटकीपर), दीपक चहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महीष थिक्षणा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!