IPL 2023 Final : रिटायरमेंटच्या प्रश्नावर धोनीचा SIX, म्हणाला, “अजून एक सीझन…”

WhatsApp Group

IPL 2023 Final MS Dhoni On Retirement : चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून विजय मिळवला. विजेतेपदानंतर भावनिक वक्तव्य करताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही निवृत्ती न घेण्याची घोषणा केली आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच त्याचे शरीर त्याला साथ देत नसल्याचा खुलासाही त्याने केला.

आयपीएलमधून निवृत्तीची अटकळ फेटाळून लावत धोनी म्हणाला की चाहत्यांच्या प्रेमाचे प्रतिफळ देण्यासाठी तो पुढील हंगामात पुन्हा खेळणार आहे. या सीझनच्या सुरुवातीपासूनच धोनीचा हा शेवटचा सीझन असेल अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्येक मैदानावर ज्याप्रकारे प्रेक्षकांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, त्यावरून ही शक्यता अधिकच प्रबळ वाटत होती. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर पाच गडी राखून विजय मिळविल्यानंतर, जेव्हा धोनीला विचारण्यात आले की हा तुमचा शेवटचा हंगाम आहे का, तेव्हा तो म्हणाला, “परिस्थिती पाहता, माझ्यासाठी निवृत्तीची ही सर्वोत्तम वेळ आहे. मी आता सोडतोय हे सांगणे माझ्यासाठी खूप सोपे आहे पण पुढचे नऊ महिने कठोर परिश्रम करून परत येऊन आणखी एक हंगाम खेळणे कठीण आहे.”

हेही वाचा – IPL 2023 Final : मोठ्या मनाचा माही..! ट्रॉफी घेताना धोनीने काय केलं? पाहा!

तो म्हणाला, “शरीराने साथ दिली पाहिजे. चेन्नईच्या चाहत्यांनी माझ्यावर ज्याप्रकारे प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यामुळे मी आणखी एक सीझन खेळणे हीच त्यांना माझी भेट असेल. त्यांनी जे प्रेम आणि उत्कटता दाखवली आहे, मीही त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. इथून सुरुवात झाली आणि संपूर्ण स्टेडियम माझ्या नावाचा जयघोष करत होता. चेन्नईतही असेच घडले पण मी परत येईन आणि माझ्याकडून होईल तेवढे खेळेन.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment