IPL 2023 Final GT vs CSK MS Dhoni lifted Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून, पाऊस आणि ओल्या आउटफिल्डमुळे, चेन्नई सुपर किंग्जला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले, जे चेन्नई सुपर किंग्ज संघाने शेवटच्या चेंडूवर गाठले आणि 5व्यांदा चॅम्पियन बनले. या विजयासह मुंबईपाठोपाठ चेन्नईचाही पाच विजेतेपद पटकावणारा संघ बनला आहे.
चेन्नईची सुरुवात दमदार होती. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. 16 चेंडूत 26 धावा करून ऋतुराज बाद झाला. त्याच षटकात डेव्हॉन कॉनवेला (47) बाद करत नूर अहमदने चेन्नईला दुहेरी धक्का दिला. यानंतर शिवम आणि रहाणेने डाव सांभाळला. रहाणे 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अंबाती रायुडूने काही मोठे शॉट्स खेळले पण 19 च्या वैयक्तिक स्कोअरवर तो बाद झाला. त्याच षटकाच्या पुढच्या चेंडूवर मोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर धोनीला झेलबाद केले.
MS Dhoni lifting Ravindra Jadeja after the win.
Picture of the day! pic.twitter.com/aReiJumtuG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2023
हेही वाचा – IPL 2023 Final : 2 बॉल 10 रन्स, जडेजाने चालवली तलवार! पाहा शेवटच्या ओव्हरमधील थरार
𝙏𝙝𝙖𝙩 𝙬𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙛𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜! 🤩
Celebrations all around in Chennai Super Kings' camp!
#TATAIPL | #CSKvGT | #Final | @ChennaiIPL pic.twitter.com/81wQQuWvDJ
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
जडेजाला धोनीने उचलले!
चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज आहे. पहिल्या चार चेंडूत केवळ तीन धावा झाल्या मात्र जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार मारून चाहत्यांच्या आशा उंचावल्या आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार मारून संघाला चॅम्पियन बनवले. या विजयानंतर जडेजाने स्टे़डियमवर जल्लोष केला. डगआऊटमध्ये धावत आलेल्या जडेजाला धोनीने उचलून घेतले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियार व्हायरल होत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!