IPL 2023 Final : फायनलनंतर दीपक चहरवर संतापला धोनी…! नक्की काय झालं? पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या 16व्या हंगामातील अंतिम सामन्यात, रवींद्र जडेजाने आपल्या चौकारांसह डकवर्थ-लुईस (DLS) नियमांनुसार संघाला 5 गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यानंतर चेन्नईचे खेळाडू एकीकडे खूप आनंदी दिसत होते. त्याचवेळी धोनी आणि दीपक चहर यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये धोनीने दीपक चहरला जर्सीवर ऑटोग्राफ देण्यास स्पष्ट नकार दिला. यादरम्यान धोनीने काहीशी नाराजीही व्यक्त केली, मात्र तो पूर्णपणे विनोदाच्या मूडमध्ये दिसला. यादरम्यान धोनी मॅचमध्ये कॅच सोडल्याबद्दल दीपकला मजेदार पद्धतीने फटकारताना दिसला.

मात्र, नंतर दीपक चहरने कसा तरी धोनीला जर्सीवर ऑटोग्राफ देण्यासाठी राजी केले. गुजरात टायटन्सच्या डावात दीपक चहरने अतिशय महत्त्वाच्या वेळी शुबमन गिलचा सोपा झेल सोडला. या सामन्यानंतर धोनी त्याला समजावताना दिसला.

हेही वाचा – IPL 2023 Final : जडेजाने चौकार ठोकताच रायुडू रडू लागला…! पाहा भावूक Video

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची कामगिरी काही खास नव्हती. विजेतेपदाच्या सामन्यात 4 षटकांच्या गोलंदाजीदरम्यान दीपक चहरला 38 धावांत केवळ 1 बळी मिळाला. दीपकच्या या मोसमातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 10 सामन्यांत 22.84 च्या सरासरीने एकूण 13 विकेट घेतल्या. या हंगामात चेन्नईसाठी तुषार देशपांडेने सर्वाधिक 21 बळी घेतले आणि त्यानंतर रवींद्र जडेजाने 20 बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment