IPL 2023 Final GT vs CSK : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईच्या विजयात अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजाने सिंहाचा वाटा उचलला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. पावसामुळे, चेन्नई सुपर किंग्जला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले, जे चेन्नई सुपर किंग्ज संघाने शेवटच्या चेंडूवर गाठले.
चेन्नईने 5व्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. सामन्यानंतर धोनीने पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकून घेतले. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी धोनीला ट्रॉफी घेण्यासाठी बोलावले, तेव्हा धोनीने रायुडू आणि जडेजाला ट्रॉफी घेण्यास सांगितले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रायुडूने आता आयपीएल निवृत्ती जाहीर केली असून तो पुढच्या हंगामात खेळताना दिसणार नाही.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦! 🏆
Chennai Super Kings Captain MS Dhoni receives the #TATAIPL Trophy from BCCI President Roger Binny and BCCI Honorary Secretary @JayShah 👏👏 #CSKvGT | #Final | @msdhoni pic.twitter.com/WP8f3a9mMc
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
What a lovely gesture by MS Dhoni.
He lets Ambati Rayudu lift the trophy as it was his last game. pic.twitter.com/kiwjwG5oYq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2023
Dhoni called Rayudu & Jadeja to take over the trophy.
What a man, Legend. pic.twitter.com/RYLWTah5Ps
— Johns. (@CricCrazyJohns) May 29, 2023
हेही वाचा – IPL 2023 Final : अहो जय शाह, हे काय करताय? ‘तो’ प्रकार कॅमेऱ्यात कैद!
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
Two shots of excellence and composure!
Finishing in style, the Ravindra Jadeja way 🙌#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/EbJPBGGGFu
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
रायुडू काय म्हणाला?
विजयानंतर रायुडू म्हणाला, ”हे कल्पनेच्या पलिकडले आहे. हे अविश्वसनीय आहे. हा विजय मला आयुष्यभर लक्षात राहील, गेल्या 30 वर्षांतील सर्व मेहनत चांगल्या कामावर पूर्ण झाल्याचा आनंद आहे. मी माझ्या कुटुंबाचे, माझ्या वडिलांचे आभार मानतो. त्यांच्याशिवाय मी आज येथे आले नसतो.” या सामन्यात रायुडूने 2 षटकार आणि एका चौकारासह 19 धावा केल्या. रायडूने केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईला विजय मिळवता आला.
A fairytale ending 😇
Congratulations to #TATAIPL 2023 Champion Ambati Rayudu on a remarkable IPL career 👏🏻👏🏻#TATAIPL | #Final | #CSKvGT | @RayuduAmbati pic.twitter.com/4U7N3dQdpw
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!