IPL 2023 Final GT vs CSK : पावसामुळे मॅच झाली नाही, तर ‘हा’ संघ ट्रॉफी नेणार!

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK : आयपीएल 2023 मध्ये आज (28 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार होता. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. पण पावसामुळे हा सामना आज होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना आता उद्या (29 मे) होणार आहे. गुजरात टायटन्सने क्वालिफायर-2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे, क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला.

या अंतिम सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा हवामानावर होत्या. Accuweather नुसार, रविवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये पावसाची 40 टक्के शक्यता होती. अहमदाबाद शहरात सुमारे 2 तास विखुरलेला पाऊस अपेक्षित होता. यासोबतच संध्याकाळी सूर्यास्तानंतर ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता होती.

राखीव दिवस 

आयपीएल 2022 मध्ये अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे. त्यामुळे आयपीएल 2023 चा विजेता आता राखीव दिवशीच ठरवला जाईल. अंतिम सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत उद्या पाऊस पडल्यास 09.40 पर्यंत खेळ सुरू झाल्यास षटकांमध्ये कोणतीही कपात होणार नाही. यानंतरही, जर हवामानाने फसवणूक केली, तर सामन्यासाठी 5-5 षटकांचा कट ऑफ वेळ 11.56 पर्यंत असेल. 11.56 पर्यंत खेळ सुरू झाला नाही तर सुपर ओव्हरचा पर्याय वापरला जाईल.

हेही वाचा – महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर..! पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती

एकही चेंडू टाकला नाही तर?

सामन्यात पावसामुळे सुपर ओव्हरचा वापर करता आला नाही आणि सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही तर गुजरात टायटन्सचा संघ विजेतेपद पटकावेल. गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर चेन्नई सुपर किंग्सने दुसरे स्थान मिळवले आहे. गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 गुण मिळवले आणि 0.809 चा नेट-रन रेट घेऊन चालत आहे. दुसरीकडे, चेन्नने 14 पैकी 8 सामने जिंकले असून त्यांचे 17 गुण आहेत.

प्लेऑफ सामन्यांचे नियम

आयपीएल प्लेइंग कंडिशन्सनुसार, फायनल, एलिमिनेटर, क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 सामना टाय राहिला तर निकाल न लागल्यास हे नियम लागू होतील.

  • 16.11.1 : अंतिम फेरीतील विजेता ठरवण्यासाठी संघ सुपर ओव्हरमध्ये एकमेकांशी खेळतील.
  • 16.11.2 : सामन्यात सुपर ओव्हर शक्य नसल्यास, आयपीएलच्या प्लेइंग कंडिशन्सनुसार परिशिष्ट एफ अंतर्गत विजेता निश्चित केला जाईल. परिशिष्ट एफ नुसार, लीग टप्प्यात गुणतालिकेत जो संघ अव्वल असेल तो विजेता घोषित केला जाईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment