IPL 2023 Final : “गुजरातला घरात घुसून…”, केदार जाधवची मराठी कॉमेंट्री पाहून जोश संचारेल!

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने दणदणीत विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. शेवटच्या दोन चेंडूंवर चेन्नईला विजयासाठी 10 धावांची गरज होती. तेव्हा रवींद्र जडेजा क्रीजवर होता. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर प्रथम षटकार आणि नंतर चौकार मारून चेन्नईला अंतिम फेरीत विजय मिळवून दिला.

केदार जाधवची कॉमेंट्री!

चेन्नईच्या धमाल विजयानंतर मराठमोळा खेळाडू केदार जाधव चर्चेत आला आहे. त्याच्या मराठी कॉमेंट्रीची व्हिडिओ जिओ सिनेमाने शेअर केला आहे. ”एकच वादा धोनी दादा, त्याने पुन्हा दाखवून दिले. पाचव्यांदा विजेतेपद, गुजरातला घरात घुसून हरवले”, असे केदार जाधव यात म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा – IPL 2023 Final : रिटायरमेंटच्या प्रश्नावर धोनीचा SIX, म्हणाला, “अजून एक सीझन…”

या सामन्यात गुजरातने 215 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार हे लक्ष्य 15 षटकांत 171 धावांवर कमी करण्यात आले. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने 5 विकेट्सवर 171 धावा करत सामना जिंकला. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने 25 चेंडूत सर्वाधिक 47 धावा केल्या. शिवम दुबेने 32 आणि अजिंक्य रहाणेने 27 धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 बळी घेतले.

आयपीएल चॅम्पियन्सची यादी!

  • 2008: राजस्थान रॉयल्स (चेन्नईचा 3 गडी राखून पराभव)
  • 2009: डेक्कन चार्जर्स (बंगळुरूचा 6 धावांनी पराभव)
  • 2010: चेन्नई सुपर किंग्ज (मुंबईचा 22 धावांनी पराभव)
  • 2011: चेन्नई सुपर किंग्ज (बंगळुरूचा 58 धावांनी पराभव)
  • 2012: कोलकाता नाइट रायडर्स (चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव)
  • 2013: मुंबई इंडियन्स (चेन्नईचा 23 धावांनी पराभव)
  • 2014: कोलकाता नाईट रायडर्स (पंजाबचा 3 गडी राखून पराभव)
  • 2015: मुंबई इंडियन्स (चेन्नईचा 41 धावांनी पराभव)
  • 2016: सनरायझर्स हैदराबाद (बंगळुरूचा 8 धावांनी पराभव)
  • 2017: मुंबई इंडियन्स (रायझिंग पुणे सुपरजायंटचा 1 धावाने पराभव)
  • 2018: चेन्नई सुपर किंग्ज (सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव)
  • 2019: मुंबई इंडियन्स (चेन्नईचा 1 धावाने पराभव)
  • 2020: मुंबई इंडियन्स (दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव)
  • 2021: चेन्नई सुपर किंग्ज (कोलकाता नाइट रायडर्सचा 27 धावांनी पराभव)
  • 2022: गुजरात टायटन्स (राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव)
  • 2023: चेन्नई सुपर किंग्ज (गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव)

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment