IPL 2023 Final : चेन्नईच्या ‘पोरामुळे’ धोनीचा डाव उधळला….! 215 रन्सचं लक्ष्य

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK : आयपीएल 2023चा अंतिम सामना ऐन रंगात आला आहे. यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वृद्धिमान साहा आणि साई सुदर्शनने यांच्या जबर खेळीच्या जोरावर गुजरातने चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे विशाल आव्हान दिले आहे.

गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलला तीन धावांवर जीवदान मिळाले. दीपक चहरने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर गिलने चांगले फटके खेळत 39 धावा केल्या. धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्याला स्टम्पिंग केले. त्यानंतर चेन्नईकर साई सुदर्शन आणि वृद्धिमान साहा यांनी संघासाठी फटकेबाजी केली. साहाने 5 चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या. साहा बाद झाल्यानंतर साईने आक्रमक फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात साई बाद झाला. त्याचे शतक फक्त चार धावांनी हुकले. त्याने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 96 धावा केल्या. हार्दिक 21 धावांवर नाबाद राहिला. 20 षटकात गुजरातने 4 बाद 214 धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2023 Final : धोनी तूच Best रे…! स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज 0.12 सेकंदात OUT

दोन्ही संघ

गुजरात टायटन्स : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कप्तान), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कप्तान/विकेटकीपर), दीपक चहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महीष थिक्षणा.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

 

Leave a comment