IPL 2023 Final : ओ माय गॉड….! CSK च्या दिग्गज खेळाडूची निवृत्ती; आज शेवटची मॅच

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK  : चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) आयपीएल 2023 च्या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी निवृत्तीची घोषणा केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या वेळी आयपीएल खेळताना दिसणार असल्याचे त्याने ट्विटरवर जाहीर केले आहे. 2019 मध्ये विश्वचषक संघात निवड न झाल्याने निवृत्त झालेला अंबाती रायुडू 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा भाग आहे.

रायुडूने लिहिले, ”2 सर्वोत्कृष्ट संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी जिंकल्या. आशा आहे की आज रात्री सहावे विजेतेपद होईल. बराच लांबचा प्रवास झाला. मी ठरवले आहे की आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील शेवटचा सामना असेल. मला ही महान स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. आता यू-टर्न नाही.”

हेही वाचा – WTC Final : पोरानं करून दाखवलं…! यशस्वी जयस्वालची टीम इंडियात एन्ट्री

2018 पासून CSK चा भाग असलेल्या रायुडूने फ्रेंचायझीसह दोन विजेतेपद जिंकली. त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्समधून आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. रायडूने 2013 मध्ये मुंबई इंडियन्ससोबत विजेतेपद पटकावताना स्पर्धेत पहिले यश चाखले. हे फ्रेंचायझीचे पहिले विजेतेपदही होते. या फलंदाजाने मोसमातील सर्व सामने खेळले. पुढच्या वर्षी CSK मध्ये जाण्यापूर्वी त्याने 2015 आणि 2017 मध्ये आणखी दोन विजेतेपदे जिंकली.

2021 मध्ये चेन्नईच्या विजेत्या संघाचाही तो भाग होता. रायुडूचा या मोसमात 16 सामन्यात 151.17 चा स्ट्राईक रेट होता. रायुडू आणि चेन्नई दोघांसाठीही गतवर्ष चांगले राहिले नाही. सुपर किंग्ज गुणतालिकेत 9व्या स्थानावर राहिला.

रायुडूची बॅट 2023 मध्ये शांत होती, परंतु धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला 15 सामन्यांमध्ये संधी दिली. त्याने या मोसमात 132.28 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या आहेत. रायुडू हा टूर्नामेंटच्या इतिहासातील 200 किंवा त्याहून अधिक सामने खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. लीगमध्ये 4239 धावांसह रायुडू सध्या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा 12वा खेळाडू आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment