IPL 2023 Dinesh Karthik On RCB Exit : आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी निराशाजनक होती. मैदानावरील संपूर्ण हंगामात हा संघ 11 खेळाडूंसह खेळत नसून अव्वल 4 फलंदाजांवर खेळत असल्याचे दिसून आले. संपूर्ण हंगामात विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या फलंदाजांच्या धावा झाल्या. गोलंदाजीदरम्यान मोहम्मद सिराजची कामगिरीही चांगली होती. असे असूनही हा संघ थोड्या फरकाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यास मुकला. आयपीएल 2022 चा हिरो दिनेश कार्तिक या मोसमात फ्लॉप झाला.
दिनेश कार्तिकने या मोसमात आरसीबीसाठी एकूण 13 सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 11.67 च्या सरासरीने केवळ 140 धावा झाल्या. मधल्या फळीतील फ्लॉपचा फटका या संघाला पुन्हा पुन्हा सहन करावा लागला. अशा परिस्थितीत जेव्हा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कार्तिककडून पहिली प्रतिक्रिया आली तेव्हा चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.
We couldn’t live up to the expectations and the results didn’t go our way. The chase for the dream shall continue….
Thanks to all the fans who stand tall with the us through thick and thin…you mean the world to us always! ❤️#RCB #PlayBold #Classof2023 #IPL2023 pic.twitter.com/SRAb52yxXA— DK (@DineshKarthik) May 23, 2023
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर!
दिनेश कार्तिकने ट्विटरवर लिहिले की, “आम्ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. निकाल आमच्या बाजूने लागला नाही. स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पुढेही त्याचा पाठपुरावा करत राहू. चांगल्या आणि वाईट काळात आमच्यासोबत राहिलेल्या सर्व चाहत्यांचे आभार. आमच्यासाठी तुम्ही संपूर्ण जग आहात.”
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक होते. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करण्यात ते निश्चितच यशस्वी झाले पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत विराट कंपनीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीला पाचव्या स्थानावर राहून आपला प्रवास संपवावा लागला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!