IPL 2023 : वॉर्नरच्या 3 बॅट्स चोरल्या..! दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचं सामान किटबॅगमधून पळवलं

WhatsApp Group

IPL 2023 Delhi Capitals : आयपीएल 2023 मध्ये, सर्वात वाईट स्थितीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंची बॅट, पॅड, ग्लोव्ह्ज आणि शूजही चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विदेशी खेळाडूंच्या बॅटचीही चोरी झाली असून, प्रत्येक बॅटची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सुमारे अर्धा डझन फलंदाजांच्या 16 बॅट चोरीला गेल्या आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना खेळल्यानंतर, जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू दिल्लीला पोहोचले आणि त्यांच्या किट बॅग त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला. कॅप्टन डेव्हिड वॉर्नरच्या 3 बॅट्स, मिचेल मार्शच्या 2 बॅट्स, फिल सॉल्टच्या 3 आणि यश धुलच्या 5 बॅट्स चोरीला गेल्या आहेत. याशिवाय कोणाचे पॅड, कोणाचे हातमोजे, कोणाचे शूज आणि क्रिकेटचे इतर साहित्य दिल्लीत पोहोचले नाही, ही नक्कीच चोरी म्हणावी लागेल.

हेही वाचा – जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश : चीन नव्हे भारत!

मात्र, दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी सराव सत्र आयोजित केले. काही फलंदाजांनी त्यांच्या एजंटशी संपर्क साधला आणि त्यांच्या बॅट कंपन्यांना पुढील सामन्यापूर्वी काही बॅट पाठवण्याची विनंती केली. परदेशी खेळाडूंना त्यांच्यासारखी बॅट एवढ्या लवकर मिळणे अवघड आहे, पण विदेशी बॅटिंग बनवणाऱ्या कंपन्याही भारतात आहेत, त्यामुळे त्यांना येथे बॅट मिळू शकतात, त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या एका सूत्राने सांगितले की, “प्रत्येकाच्या किट बॅगमधून काहीतरी गहाळ झाल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला. अशी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलिस आणि नंतर विमानतळ प्राधिकरणाकडे नेण्यात आले. तपास सुरू आहे.” खेळाडू येण्यापूर्वी त्यांचे सामान त्यांच्या हॉटेलच्या खोलीबाहेर पोहोचेल याची खात्री करण्यासाठी आयपीएल संघ एका लॉजिस्टिक कंपनीला कामावर घेतात. इथेही तेच घडले, पण किट बॅगमधून बॅट चोरीला गेल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment