IPL 2023 : “तो मला शिव्या…” मोहम्मद सिराजसोबतच्या भांडणावर सॉल्टचा खुलासा!

WhatsApp Group

IPL 2023 Mohammed Siraj Phil Salt Fight : आयपीएलमध्ये गेल्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीचे खेळाडू वादात सापडले आहेत. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC vs RCB) झालेल्या सामन्यात आरसीबीचा सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद सिराज दिल्लीचा फलंदाज फिल सॉल्टसोबत भांडताना दिसला. या मोसमात मोहम्मद सिराज पॉवरप्लेमध्ये उत्तम ठरला, पण पण शनिवारी रात्री सॉल्टने त्याच्या गोलंदाजीवर धावा केल्या. सामन्याच्या पाचव्या षटकात सिराजने 19 धावा खर्च केल्या. यानंतर त्याचा सिराजसोबत जोरदार वाद झाला. बाऊन्सर टाकल्यानंतर सिराज सॉल्टकडे बोट दाखवताना दिसला.

सॉल्टने 19 धावांच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारला. सिराजला दुसरा स्पेल दिला गेला नाही. त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामात, सॉल्टने 45 चेंडूत 87 धावा करून यजमानांना जोरदार विजय मिळवून दिला.

काय म्हणाला सॉल्ट?

फिल सॉल्ट सामन्यानंतर म्हणाला, ”मी माझ्या खेळीबद्दल खूप समाधानी आहे. अर्थात सुई टोचल्यासारखं वाटलं. यासाठी खेळाडू सज्ज झाले होते. गेल्या वेळी आम्ही बंगळुरूमध्ये खेळत होतो तेव्हाही असेच घडले होते. त्यामुळेच उत्तरे द्यावी लागतील पण मर्यादा ओलांडू नका, असे सामन्यापूर्वी बोलले जात होते. आम्हाला वाटते की आम्ही खूप चांगले केले. काही शब्द बोलले गेले पण बाकी ठीक होते.”

हेही वाचा – विमाने 30 ते 40 हजार फूट उंचीवरच का उडवली जातात? जाणून घ्या कारण!

सॉल्ट आणि सिराजमध्ये काय झाले याचा खुलासा झाला आहे. मोहम्मद सिराज सतत शिव्या देत होता. यानंतर सॉल्टनेही प्रत्युत्तर दिले. सिराजच्या शिव्या ऐकल्यानंतर सॉल्टने त्याला सांगितले, की मित्रा तुझा संघ अजूनही जास्त धावा बनवू शकली असती.” सामन्यानंतर सॉ़ल्ट-सिराज गळाभेट घेतानाही दिसले.

दिल्लीच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच सिराजला लक्ष्य केले आणि त्याच्या दोन षटकांत 28 धावा केल्या. आरसीबीच्या सर्वोत्तम गोलंदाजाला टार्गेट करण्याची रणनीती आखल्याचे सॉल्टने सांगितले.

सामन्यादरम्यान मोहम्मद सिराज फिल सॉल्टसोबत भांडताना दिसला. हा सलग दुसरा सामना आहे ज्यात आरसीबीच्या खेळाडूंनी मैदानावर धारदार वृत्ती दाखवली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही आरसीबीचा स्टार फलंदाज कोहली आणि लखनऊचा गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली होती, ज्यासाठी दोघांना दंड ठोठावण्यात आला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment