IPL 2023 DC vs MI : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने आपले विजयाचे खाते उघडले आहे. मागील दोन सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात मुंबईने दिल्लीला 6 गड्यांनी मात दिली. शेवटच्या चेंडूवर मुंबईला 2 धावा हव्या होत्या. टिम डेव्हिडने 2 धावा घेत स्पर्धेतील पहिला विजय मुंबईच्या झोळीत टाकला.
मुंबईकडून दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि अक्षर पटेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीचा संघ 19.4 षटकांत 172 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वॉर्नरने 6 चौकारांसह 51 तर अक्षर पटेलने 25 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 54 धावा केल्या. मुंबईकडून जेसन जेसन बेहरेनडॉर्फ आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईकडून कप्तान रोहित शर्माने 6 चौकार आणि 4 षटकारांसह 65 धावा केल्या. तिलक वर्माने एक चौकार आणि 4 षटकारांसह 41 धावा केल्या. डेव्हिडने नाबाद 13 तर ग्रीनने नाबाद 17 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 बळी घेतले.
What a finish! This year's IPL just keeps on giving 🔥🔥
Two needed off the last ball and Tim David puts in the dive to give Mumbai Indians their first win of 2023.#IPL2023 pic.twitter.com/ECbNhPyYy0
— Wisden (@WisdenCricket) April 11, 2023
He promised us & he kept his promise. 💙#OneFamily #DCvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ImRo45 pic.twitter.com/7W7F4YYv0M
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2023
हेही वाचा – जीप आणणार फक्त 10 लाखात शक्तिशाली SUV..! ब्रेझ्झा आणि नेक्सॉनला मागे टाकणार?
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कप्तान), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, मुस्तफिजुर रहमान.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!