IPL 2023 : डेव्हिड वॉर्नरला 12 लाखांचा तर विराट कोहलीला 24 लाखांचा दंड..! ‘हे’ आहे कारण

WhatsApp Group

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH vs DC) खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 7 धावांनी पराभव केला. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा संघाचा चालू हंगामातील पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”

आयपीएलचे सामने तीन तास आणि 20 मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असते, परंतु स्लो ओव्हर रेट ही समस्या बनत आहे कारण बहुतेक सामने चार तासांहून अधिक लांबले आहेत.

हेही वाचा – WTC Final : अजिंक्य रहाणेला बक्षीस..! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा; पाहा संघ!

विराट कोहलीला 24 लाखांचा दंड

त्याचवेळी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीलाही 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीशिवाय त्याच्या संघातील सदस्यांनाही हा दंड भरावा लागणार आहे. आरसीबीच्या प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या उर्वरित खेळाडू आणि इम्पॅक्ट पर्यायांना 6 लाख रुपये किंवा 25 टक्के मॅच फी यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आरसीबीने स्लोओव्हर रेटशी संबंधित चूक केली. विराट कोहलीशिवाय त्याच्या संघातील सदस्यांनाही हा दंड भरावा लागणार आहे.

16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. तो प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधार होता. त्याचवेळी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनाही 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेनुसार, कर्णधाराने पहिल्यांदा असे केल्यास 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment