IPL 2023 CSK vs SRH Ravindra Jadeja Angry : आयपीएल 2023 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने आले. चेन्नई संघाने आपल्या घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी हैदराबाद संघाला 20 षटकांत 134 धावांवर रोखले. चेन्नईच्या या सामन्यात रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत 22 धावा देत तीन बळी घेतले.
या सामन्यात रवींद्र जडेजा आणि हैदराबादचा खेळाडू हेनरिक क्लासेन यांच्यात चांगलीच जुंपली. मयंक अग्रवालची विकेट घेतल्यानंतर, रवींद्र जडेजाने हेनरिक क्लासेनला सुनावले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रवींद्र जडेजा 14व्या षटकात गोलंदाजी करायला आला. मयंक अग्रवालने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक शॉट खेळला, जो थेट गोलंदाज रवींद्र जडेजाच्या दिशेने येत होता, या झेलच्या मध्येच क्लासेन आला. जडेजा नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या क्लासेनला टक्कर देत झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपयश आले. यानंतर जडेजा रागावलेला दिसत होता. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मयंक अग्रवालला धोनीने यष्टीमागे त्रिफळाचीत केले, त्यानंतर जडेजा क्लासेनला काहीतरी बोलताना दिसला.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) April 21, 2023
Ravindra Jadeja collided with Klaasen while trying for Mayanak Agarwal's catch 😑
And its clearly evident that Jaddu wasn't happy with Klaasen after that drop 🥶
📸: Jio Cinema#CSKvsSRH | #TATAIPL | #IPL2023 pic.twitter.com/yO6h5xz0GG
— CricWatcher (@CricWatcher11) April 21, 2023
हेही वाचा – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे? जाणून घ्या!
हैदराबादची वाईट फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 134 धावाच करता आल्या. अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने 21 आणि हेनरिक क्लासेनने 17 धावा केल्या. मार्को जानसेन 17 धावा करून नाबाद राहिला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!