IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीची डबल सेंच्युरी..! चेन्नईत रचला इतिहास; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 MS Dhoni 200 Match As Captain : आज आयपीएल 2023 मध्ये, चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि 2008 चा चॅम्पियन राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळत असून मैदानात उतरल्यानंतर त्याने एक खास विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाचे 200 सामने नेतृत्व करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

धोनीने सीएसकेसाठी या सामन्यासह 200 सामन्यांचे नेतृत्व केले आहे. याशिवाय तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधारही होता. संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या हस्ते धोनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत चित्रा श्रीनिवासन आणि रूपा गुरुनाथही उपस्थित होत्या.

हेही वाचा – Property Tax : प्रॉपर्टी टॅक्स का भरावा लागतो? डिफॉल्टरमध्ये नाव आलं तर?

कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावले होते. याशिवाय त्याने आपल्या संघाला 15 पैकी 11 वेळा अंतिम चारमध्ये नेले आहे. चार वेळा ट्रॉफी जिंकण्याबरोबरच हा संघ पाच वेळा उपविजेताही ठरला आहे. धोनीने आजच्या सामन्यापर्यंत एकूण 213 सामन्यांचे (CSK/RPS) नेतृत्व केले आहे. यापैकी त्याने 125 सामने जिंकले आहेत. याशिवाय 87 सामने हरले आहेत. एक सामना अनिर्णित आहे. त्याची विजयाची टक्केवारी 58.96आहे. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

या यादीत रोहित आणि कोहलीचाही समावेश

41 वर्षीय धोनीचे हे शेवटचे आयपीएल असू शकते, असे मानले जात आहे. धोनीशिवाय रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 146 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. यापैकी मुंबईने 80 सामने जिंकले असून 62 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. चार सामने बरोबरीत आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 140 सामन्यांत नेतृत्व केले आहे. यातील 64 सामने आरसीबीने जिंकले आहेत, तर 69 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन सामने टाय झाले असून चार सामने अनिर्णित राहिले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment